Thane Suicide: लेक-सूनेकडून होणार्या मानसिक त्रासला कंटाळून 61 वर्षीय महिलेची आत्महत्या
आयपीसी 306, 504, 506 आणि 34 अंतर्गत त्यांनी गुन्हा दाखल केला आहे.
ठाण्यामध्ये (Thane) 61 वर्षीय महिलेने गळफास घेत राहत्या घरी आत्महत्या (Suicide) केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही 2 मार्च ची घटना आहे. या वृद्ध महिलेने 12 पानी सुसाईड नोट लिहली आहे. यामध्ये लेक आणि सुन यांच्याकडून मानसिक त्रास दिला जात असल्याची तक्रार त्यांनी नोंदवली आहे. या महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या लेकीला फोन केला होता. आपली या जाचातून सुटका करावी अशी अपेक्षा तिने व्यक्त केली होती. यावेळी तिने आपल्या जीवाला धोका असल्याचंदेखील म्हटलं होतं.
मिड डे च्या रिपोर्ट नुसार, महिलेचं नाव सुषमा विलास खैरनार होते. सुषमा या त्यांचा मुलगा राहुल आणि सून गौरी सोबत राहत होत्या. राहुल-गौरी चं 2014 मध्ये लग्न झालं होतं. पोलिसांच्या माहितीनुसार, या जोडप्याचं मृत सुषमा यांच्यासोबत संबंध ताणलेले होते. सुषमा यांना घरात फिरण्यावर देखील बंधन होती. सुसाईड नोट मध्ये त्यांनी दिलेल्या माहितीमध्ये आपल्या लेकाची आणि सूनेची अपेक्षा होती की त्यांनी वृद्धाश्रमामध्ये राहावं. नक्की वाचा: सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, जाड असल्या कारणाने सासरच्यांकडून होत होता छळ .
सुषमा यांच्या मृत्यूची माहिती मिळताच त्यांच्या लेकीने नौपाडा पोलिस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली आहे. पोलिसांना तिने देखील 2 मार्च दिवशी आईचा फोन आला होता आणि तिने जीवाला धोका असल्याचं सांगितलं आहे. दुसर्या दिवशी आपण भेटायला येणार असल्याचं लेकीने आईला सांगितलं होतं पण या त्यापूर्वीच सुषमा यांनी टोकाचं पाऊल उचललं होतं.
सुसाईड नोट मिळाल्यानंतर पोलिसांनी मुलगा आनी सून यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. आयपीसी 306, 504, 506 आणि 34 अंतर्गत त्यांनी गुन्हा दाखल केला आहे.