सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, जाड असल्या कारणाने सासरच्यांकडून होत होता छळ

जाड असल्यामुळे सासरच्यांकडून होणा-या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, जाड असल्या कारणाने सासरच्यांकडून होत होता छळ
(Photo courtesy: archived, edited images)

आजपर्यंत आपण हुंड्यासाठी, पैशांसाठी विवाहित महिलांना मारल्याच्या, जाळल्याच्या घटना ऐकल्या. मग कधी कधी पैशांची, हुंड्याची मागणी इतकी वाढत जाते, की विवाहितांना आत्महत्या हा एकच पर्याय दिसतो. मात्र पिंपरीतील गव्हाणेवस्ती गावात एक विचित्रच घटना ऐकायला मिळाली आहे. ह्या घटनेत महिला जाड असल्यामुळे तिची सासरची मंडळी तिचा शारीरिक तसेच मानसिक छळ करत होती. ह्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रियंका केदार पेटकर (35) (Priyanka Petkar) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका शरीराने थोडी जाड होती. त्यामुळे तिचा पती, सासू-सासरे यांनी संगनमताने तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करायला सुरुवात केली. तसेच घटस्फोट देण्यासाठी तिच्यावर खूप दबाव देखील टाकला. अखेरी सासरच्या लोकांचा छळ असह्य झाल्याने प्रियंका ने आपल्या माहेरी असताना ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

अहमदनगर: मुलगा शिक्षक असून नोकरी नाही, बेरोजगारीला कंटाळून आईची आत्महत्या

या प्रकरणी प्रियंकाचा भाऊ पुष्कराज याच्या तक्रारीवरुन प्रियंकाचे पती केदार पेटकर, सासू सुरेखा पेटकर, सासरे श्रीकांत पेटकर आणि जगदीश माडीवाला यांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

(The above story first appeared on LatestLY on May 28, 2019 12:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).