Thane: धक्कादायक! 27 वर्षीय जावयाने केला 45 वर्षीय सासूवर बलात्कार; लग्नाआधीपासून होते एकतर्फी प्रेम
पीडितेच्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम 376, 506 अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. घटना उघडकीस आल्यापासून आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले
महाराष्ट्रातील ठाणे (Thane) जिल्ह्यात सासू-जावयाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. 27 वर्षीय जावयावर त्याने त्याच्या 45 वर्षीय सासूवर बलात्कार (Rape) केल्याचा आरोप आहे. आरोपीविरुद्ध हिललाइन पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरची माहिती मिळताच आरोपी जावई पळून गेला. सध्या पोलिसांचे पथक त्याच्या शोधात आहे. ही घटना ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमधील आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार हे कदाचित अफेअरबाबतचे प्रकरण असू शकते.
पोलीस अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित सासू हिललाइन पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते, तर आरोपी जावई देखील उल्हासनगर येथे राहतो. आरोपी जावई लग्नाआधीपासून पत्नीच्या आईवर म्हणजेच सासूवर एकतर्फी प्रेम करत होता. लाजेखातर तो सासूशी लग्न करू शकला नाही. त्यामुळे आरोपीने पीडितेच्या मुलीकडे लग्नाची मागणी केली. त्यानंतर त्यांनी 2018 साली लग्न केले. त्यानंतर आता सासूने जावयावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
पीडितेच्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम 376, 506 अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. घटना उघडकीस आल्यापासून आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र त्याला लवकरच अटक करण्यात येईल. दरम्यान, आरोपी जावयाला अटक केल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल, असे स्टेशन प्रभारींनी सांगितले. (हेही वाचा: Jalna Crime: जालन्यात पैशाच्या मोहापायी पोटच्या अल्पवयीन मुलीचं तीन वेळा लग्न, एकास अटक)
दरम्यान, यापूर्वी मुंबईतील साकी नाका परिसरात बलात्काराची एक लाजिरवाणी घटना घडली होती. येथे खैरानी रोडवर एका 32 वर्षीय महिलेवर आधी बलात्कार झाला आणि बलात्कारानंतर आरोपीने महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकला. अशा स्थितीत महिलेला अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेने दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. याप्रकरणी माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकून आरोपीला अटक केली.
(The above story first appeared on LatestLY on Dec 05, 2021 07:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

