Thane Shocker: धक्कादायक! एका महिलेने आपल्या दोन चिमुकल्यांची हत्या करून आत्महत्येचा केला प्रयत्न

ऐरोली पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, रविवारी घणसोली परिसरात ही घटना घडली असून त्यामागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Thane Shocker: धक्कादायक! एका महिलेने आपल्या दोन चिमुकल्यांची हत्या करून आत्महत्येचा केला प्रयत्न
(Archived, edited, symbolic images)

ठाणे जिल्ह्यात (Thane) धक्कदायक घटना घडली आहे. 31 ऑक्टोबरला नवी मुंबई (Navi Mumbai) शहरात एका 32 वर्षीय महिलेने आपल्या दोन चिमुकल्यांची हत्या करून आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली. ऐरोली पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, रविवारी घणसोली परिसरात ही घटना घडली असून त्यामागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. त्यांनी सांगितले की, महिलेचा पती कामानिमित्त बाहेर गेला होता तेव्हा तिने आपल्या चार वर्षांच्या मुलीचा आणि एका वर्षाच्या मुलाचा गळा चिरला.

दुपारी चारच्या सुमारास पतीला दोन्ही मुले मृतावस्थेत आढळून आली आणि पत्नीचे मनगट कापलेले दिसले, असे अधिकाऱ्याने सांगितले. महिलेला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले, असे त्यांनी सांगितले. (हे देखील वाचा: Chembur Road Accident: चेंबुर परिसरात भरधाव वेगात असलेल्या दुचाकी-चारचाकी च्या धडकेत एकाचा मृत्यू; पहा अपघाताची काळजाचा ठोका चुकवणारी दृश्य (Watch Video)

अधिकाऱ्याने सांगितले की, कुटुंब काही दिवसांत उत्तर प्रदेशातील त्यांच्या घरी जाण्याचा विचार करत होते. त्यांनी सांगितले की, पोलिसांनी महिलेविरुद्ध खून आणि अन्य संबंधित तरतुदीनुसार गुन्हा दाखल केला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Oct 31, 2022 12:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).