Thane Crime News: 2 व्यक्तींची केली हत्या, मृतदेह टाकला कसारा घाटात, ठाणे पोलिसांनी 4 जणांना घातल्या बेड्या

ठाण्यातील कसारा घाटात हत्या करून मृतदेह टाकल्या प्रकरणी पोलीसांनी चार जणांना अटक केले आहे.

Arrest (PC -Pixabay)

Thane Crime News:  महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील कसारा घाटात जूनमध्ये ज्यांचे मृतदेह सापडले होते अशा दोघांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी शिर्डी येथून चार जणांना अटक केली आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने रविवारी दिली. 24 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आले. पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, दोघे मृत व्यक्ती सोशल मीडियावर एका महिलेचा छळ करत होते, मृत व्यक्ती आरोपीच्या ओळखीचे होते. आणि महिलेची छळ केल्या प्रकरणी त्यांनी त्यांची हत्या केली.

19 जून रोजी  ठाण्यातील कसारा घाटात वेगवेगळ्या ठिकाणी दोघांचे मृतदेह आढळून आले होते. त्यानंतर ठाणे पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध खून आणि पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान, पोलिसांना कळले की अहमदनगर जिल्ह्यातील लोणी पोलीस ठाण्यात दोन बेपत्ता व्यक्तींची तक्रार नोंदवण्यात आली आहे. त्यानुसार त्या व्यक्तींची शोध घेण्यात आली.  कसारा घाटात दोन व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने पोलीसांनी ही माहिती इतर पोलीस ठाण्यात देखील देण्यात आली.

मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा येथे सापडलेल्या दोन मृतदेहांशी बेपत्ता व्यक्तींचा तपशील जुळत असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली पोलीसांनी तपासणी साठी पथका नेमली होती . चौकशीच्या आधारे, पोलिसांनी 23 ते 25 वयोगटातील चौघांना अटक केली, ते सर्व अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी शहरातील रामनगर येथील रहिवासी आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.