Thane: ठाणे पोलिसांची मोठी कारवाई! 45 दिवसांच्या चिमुरडीला विकण्याचा कट उधळून लावला; आईसह चौघांना अटक

पैसे सुपूर्द केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बाळाच्या आईसह चार जणांना अटक केली.

Baby | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Thane: ठाणे जिल्ह्यातून (Thane District) अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. ठाणे शहर पोलिसांनी (Thane City Police) 45 दिवसांच्या चिमुरडीला विकण्याचा प्रयत्न यशस्वीपणे उधळून लावला. याप्रकरणी पोलिसांनी बाळाच्या आईसह चार जणांना अटक केली. विश्वासार्ह माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी एका फसव्या ग्राहकाचा वापर करून आरोपींशी संपर्क साधला. या ग्राहकाने कल्याणमधील हॉटेलजवळ भेटण्याची व्यवस्था केली होती.

मंगळवारी बाळाची आई आणि इतर तीन साथीदारांनी ग्राहकाला भेटून बाळासाठी चार लाख रुपयांची मागणी केली. पैसे सुपूर्द केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बाळाच्या आईसह चार जणांना अटक केली. (हेही वाचा -Women Thrashing Each Other at Nashik Toll Plaza: पैसे भरण्यावरुन वाद; CRPF जवानाची पत्नी आणि महिला टोल कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी, Video Vira)

वैशाली किशोर सोनवणे (35), दीपाली अनिल दुसिंग (27), रेखा बाळू सोनवणे (32, बाळाची आई) आणि किशोर रमेश सोनवणे (34) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, बाळाची आई रेखा ही भिकारी असल्याचं समोर आलं आहे. (हेही वाचा - Kandivali Shocker: कांदिवली भागामध्ये तोंडाच्या मुसक्या आवळलेल्या अवस्थेमध्ये गटारात सापडले 5 भटक्या कुत्र्यांचे मृतदेह; गुन्हा दाखल)

बाळाला आणि तिच्या 5 वर्षांच्या भावाला डोंबिवलीतील निवारागृहात ठेवण्यात आले आहे. तसेच तिच्या 9 आणि 7 वर्षांच्या दोन बहिणींना अंबरनाथमधील 'निला बालसदन' येथे पाठवण्यात आले आहे. रेखाने पोलिसांना सांगितले की, तिचा पती आर्थिकदृष्ट्या हताश होऊन तिला सोडून दुसऱ्या महिलेकडे गेला. बिकट परिस्थितीमुळे तिने मुलीला विकण्याचा प्रयत्न केला.