Thane Accident News: घोडबंदर पुलावर खाद्यपदार्थ वाहून नेणारा ट्रक उलटला, रस्त्यावर दोन तास वाहतुक कोंडी
ठाण्यातील घोडबंदर पुलावर खाद्य पदार्थ वाहून नेणारा ट्रक उलटला. सोमवरच्या पहाटे ही घटना घडली.
Thane Accident News: ठाण्यातील पाटलीपाडा परिसरात खाद्य पदार्थ वाहून नेणारा ट्रक पलटी झाला आहे. ठाण्यातील घोडबंदर पुलावर सोमवारी पहाटे 1.30 हा ट्रक पलटी झाला. या घटनेमुळे रस्त्यावर दोन तास वाहतुक कोंडी झाली होती. अशी माहिती ठाण्याच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या (आरडीएमसी) अधिकाऱ्याने दिली. ठाण्यातील घोडबंदर रोड येथील पाटलीपाडा पुलावर खाद्यपदार्थ घेऊन जाणारा कंटेनर उलटला. ही माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे पथक, चितळसर पोलीस कर्मचारी, कासारवडवली वाहतूक पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी दोन क्रेन मशीन, दोन पिकअप वाहने आणि एक अग्निशमन वाहनासह घटनास्थळी पोहोचले. दोन तासानंतर रस्ता सुरळीत चालू झाला.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement