Thane District Central Co Operative Bank Election: ठाणे जिल्हा बँक निवडणूकीसाठी एकनाथ शिंदे, जितेंद्र आव्हाड यांच्याकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा

ही निवडणूक महाविकास आघाडीकडून एकत्रित लढवण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तर ठाणे जिल्हा बँक निवडणूकीसाठी 6 उमेदवार हे बिनविरोध निवडून आले आहेत.

एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड (Photo Credits-Twitter)

Thane District Central Co Operative Bank Election:  मार्च महिन्याच्या अखेरीस ठाणे जिल्हा बँक निवडणूक पार पडणार आहे. ही निवडणूक महाविकास आघाडीकडून एकत्रित लढवण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तर ठाणे जिल्हा बँक निवडणूकीसाठी 6 उमेदवार हे बिनविरोध निवडून आले आहेत. परंतु 15 जागांसाठी आता उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यानुसार शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी निवडणूकीसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आाहे.(Maratha Reservation: मराठा आरक्षण मुद्द्यावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र)

ठाणे मध्यवर्ती बँकेचे निवडणूक येत्या 30 मार्चला होणार असून 31 मार्चला मतमोजणी केली जाणार आहे. तर ही निवडणूक महाविकास आघाडी संयुक्तपणे लढवणार असल्याचे एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले होते. तर या निवडणूकीसाठी एनसीपीचे बाबाजी पाटील आणि बाबूराव दिघा आणि शिवसेनेचे अमित घोडा यांची बिनविरोध निवड झाली आहे.(MNS Registration: मनसे सदस्य नोंदणी अभियानाला आजपासून सुरुवात; राज ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवाजी पार्क येथे शुभारंभ)

तर एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांनी 15 जागांसाठी जाहीर केलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे-

पंडीत पाटील. सुधीर पाटील, सुभाष पवार. मधुकर पाटील. प्रकाश वरकुटे, सुनील पाटील, किरण सावंत, लाडक्या खरपडे. हणमंत जगदाळे, निलेश सांबरे, अनिल शिंदे, विशाखा खताळ, प्राजक्ता पानसरे आणि शोभा म्हात्रे.

दरम्यान, या निवडणुकीमध्ये कृषी-पतसंस्थांमधून 14, पगारदार पतसंस्थांमधून 1, खरेदी-विक्री संघातून 1, महिला राखीव 2, अनु.जाती-जमातींसाठी 1 आणि ओबीसींसाठी 1 जागा राखीव आहे. 3 हजार 68 मतदार या निवडणुकीमध्ये मतदान करणार आहे.