Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल
या क्लिपमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला जीवे मारण्याचा कथीत उल्लेख ऐकायला मिळतो. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (Jitendra Awhad) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी देणारी कथीत ऑडिओ क्लिप (Audio Clip) व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला जीवे मारण्याचा कथीत उल्लेख ऐकायला मिळतो. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही. ऑडिओ क्लिपमध्ये दोन व्यक्ती फोनद्वारे बोलत आहेत. यात पहिला व्यक्ती जितेंद्र आव्हाड यांची मुलगी नताशा आणि त्यांच्या जावयाचा स्पेनमधील पत्ता शोधून काढला असल्याची माहिती समोरच्या व्यक्तीला देतो आहे. व्हिडिओमध्ये हत्येबाबत बोलणारी व्यक्ती . ठाणे पालिकेचे प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश आहेर असल्याचा दावा केला जात आहे.
प्रसारमाध्यमांनी जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता, जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले की, आपण पोलिसांमध्ये कोणतीही तक्रार करणार नाही. कारण तक्रार दाखल करुन काहीही होत नाही. केवळ आणि केवळ चौकशी आणि चौकशीच सुरु असल्याचे सांगितले जाते. त्यापेक्षा तक्रार न केलेले बरे. मात्र, पोलिसांनी त्या कथीत ऑडीओ क्लिपमधील बाबाजी कोण आहे हे मात्र शोधून काढावे, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. (हेही वाचा, Eknath Shinde vs Jitendra Awhad: ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांना आव्हान, राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का, ज्येष्ठ नेत्यांसह 5 माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश निश्चित)
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची कथीत ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. दरम्यान, कार्यकर्त्यांनी आयुक्त महेश आहेर यांना कधीतरित्या मारहाण केल्याची घटनाही पुढे आली आहे. जितेंद्र आव्हाड यांना या घटनेबाबत विचारले असता त्यांनी याबाबत आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले.
एका आमदाराच्या कुटुंबीयांबाबत अशा प्रकारे ऑडिओ क्लिप बाहेर येणे अत्यंत धक्कादायक मानले जात आहे. एखाद्या आमदाराच्या बाबतीत अशा प्रकारची ऑडिओ क्लिप आणि चर्चा होत असेल तर सर्वसामान्य माणसांच्या बाबतीत काय होईल, असा सवाल आता सर्वसमान्य नागरिकांतून उपस्थित केला जातो आहे. पोलिसांनी तातडीने या ऑडिओ क्लिपची माहिती घेऊन संबंधितावर कारवाई करावी, असा सूर समाजातून उमटू लागला आहे.