Thane Crime: संतापजनक! पत्नी घराबाहेर जाताच सहा वर्षीय चिमुकलीवर करायचा अत्याचार; तब्बल 6 महिन्यानंतर सावत्र बापाला अटक

एका सावत्र बापाने आपल्या सहा वर्षीय सावत्र मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.

Image Used for Representational Image Only | (Photo Credits: Latestly/Illustration)

माणुसकीला काळिंमा फासणारी घटना मुंब्रा (Mumbra) पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. एका सावत्र बापाने आपल्या सहा वर्षीय सावत्र मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी 44 वर्षीय आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडिताची आई घराबाहेर जाताच आरोपी तिच्या गुप्तांगावर मेणाचे चटके द्यायचा. तसेच तिला अमानुष मारहाण करत असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या पीडित मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे समजत आहे.

आरोपी हा मुंब्र्यातील रशिद कंपाऊंडमध्ये भाड्याच्या घरात राहत होता. त्याच्यासोबत त्याची पत्नी आणि सावत्र मुलगीदेखील राहत होती. दरम्यान, पीडित मुलीची आई घराबाहेर जाताच नराधम सावत्र बाप पीडिताला अमानुष मारहाण करायचा. तसेच तिच्या सर्वांगावर माचीस आणि मेणबत्तीचे चटकेदेखील द्यायचा. एवढेच नव्हेतर, याबाबत बाहेर कुठे वाच्यता केली तर जीवे मारण्याची धमकीही देत होता. हा धक्कादायक प्रकार तब्बल सहा महिने सुरु होता. परंतु, याची माहिती होताच आजूबाजुच्या परिसरात राहणाऱ्या महिलांनी तिच्याकडे चौकशी केली. त्यावेळी धीर मिळाल्याने पीडित मुलीने आपल्या सावत्र बापाच्या कृत्यांबाबत त्या महिलांना सांगितले. त्यानंतर ही घटना उघडकीस आली, अशी माहिती टीव्ही9ने आपल्या वृत्तात दिली आहे. हे देखील वाचा- Pune Murder: सुनेच्या हत्येची सुपारी दिलेल्या आरोपींनी सासऱ्याचाच खून; पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना

 दरम्यान शेजारी राहणाऱ्या महिलांनी पीडिताच्या आईला याबाबत माहिती दिली. याची खात्री पटताच पीडिताच्या आईच्या कौसा पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर पीडिताच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याच्यावर भादंवी कलम 376, 323, 506 (2), बाल न्याय अधिनियम कलम 75, पोस्को 4, 6, 8, 10, 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती मुंब्रा पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली आहे. याप्रकरणी पोलीस उप निरीक्षक दिपक घुगे यांनी पुढील चौकशी सुरुवात केली आहे.