Kalyan Shocker: कल्याणमधील धक्कादायक घटना, एकतर्फी प्रेमातून 12 वर्षीय मुलीचा खून; आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

अवघ्या १२ वर्षीय मुलीचा आईसमोरच हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

Kalyan Shocker:  कल्याणमधील (Kalyan) कोळसेवाडी परिसरात एकतर्फी प्रेमातून  एका 20 वर्षीय प्रियकराने 12 वर्षीय तरुणीची पाच ते सहा वार करून हत्या केली आणि नंतर दारू पिऊन आत्महत्येचा (Suicide) प्रयत्न केला. फिनाइल  पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आरोपीला पोलिसांनी पकडले. ही घटना पीडितेच्या आईसमोर घडली. आदित्य कांबळे (20) असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, आरोपीने मुलीवर अनेक वेळा वार केले आणि ती वेदनेने ओरडली.

कल्याण पूर्व भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आमदार गणपत गायकवाड म्हणाले की, "घटना घृणास्पद आहे. कल्याण परिसरात लोकसंख्या वाढत आहे, पण लोकसंख्येच्या तुलनेत कल्याण भागात पोलिसांचा मनुष्यबळ कमी आहे. आम्ही अधिक पोलिस ठाण्याची मागणी केली आहे. भविष्यात घटनांची पुनरावृत्ती होणार नाही."

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलीसांनी धाव घेतला त्यावेळी पायऱ्यांवर सगळीकडे रक्त सांडले होते. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार ही हत्या प्रियकरांने एकतर्फि प्रेमाने केली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपींने आई समोरचं मुलीवर वार केला. आईने वाचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपीने महिलेला जोरात धक्का दिला. नराधमाने अवघ्या 12 वर्षीय मुलीवर चाकूने चार ते पाच वेळा वार केला. सुत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार आरोपीने फिनायल पिवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले.

या घटनेअंतर्गत पोलीसांनी कल्याण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीसांना मुलीचा मृतदेह कल्याण येथील रुग्णालयात नेला आहे. पोलीसांनी पुढील चौकशी सुरु केली आहे. या घटनेमुळे कल्याण परिसर हादरले आहे. या घटनेमुळे पुन्हा मुलीच्या सुरक्षितेचा प्रश्न उभा राहिला आहे.