Thane Crime: दहावीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार, अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी, गुन्हा दाखल होताच आरोपीने संपवले आयुष्य

ठाण्यात एका अल्पवयीन मुलीवर शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

physical-relationship | (File Image)

Thane Crime: ठाण्यात एका अल्पवयीन मुलीवर शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने पीडित मुलीचे अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली होती. पीडित मुलीने या प्रकरणी पोलिसात तक्रार केल्याने आरोपीने मित्राच्या घरी जाऊन आत्महत्या केली आहे. या संपुर्ण घटनेनंतर शहरात खळबळ उडाली आहे. पीडित मुलगी 16 वर्षाची आहे. ती सध्या दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. (हेही वाचा- मनोरुग्ण महिलेचा मुलीच्या हत्येनंतर आत्महत्येचा प्रयत्न

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेजारी राहणारी पीडित मुलीचे बाथरुममध्ये अंघोळ करत असतानाचे अश्लिल फोटो आरोपीने मोबाईलमध्ये चित्रित केले होते. त्यानंतर पीडित मुलीला भेटून तिला फोटो दाखवून व्हायरल करण्याची धमकी दिली. तुझ्या कुटुंबाला मारून टाकेल अशी धमकी देऊन आरोपीने पीडितेवर बलात्कार केला.पीडित मुलीचे घराचे बाथरुम मागच्या बाजूला होता. 18 जानेवारी 2024 पासन ते 15 फेब्रुवारी पर्यंत पीडितेवर बाथरुममध्येच बलात्कार केला. आरोपी 37 वर्षाचा असून त्याचे लग्न देखील झाले होते परंतु पत्नी त्याला सोडून गेल्यानंतर तो एकटाच राहत होता.

पीडित मुलीने कंटाळून अखेर आईला घटनेची माहिती दिली. आईने आणि पीडित मुलीने पोलिस ठाण्यात धाव  घेतली. मुरबाड पोलिसांनी दोघांना दिवसभर थांबवून घेतले परंतु तक्रार नोंदवला नाही अशी माहिती तक्रारदाराने केली.या नंतर पीडित मुलीने सामाजिक कार्यकर्त रवीद्र चंदने यांच्याकडे लेखी तक्रार नोंदवली. त्यानंतर रविंद्र पोलिस ठाण्यात हजर राहून पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची लेखी मागणी केली.

त्यानंतर पोलिस ठाण्यात पीडित मुलीची तक्रार नोंदवण्यात आला. आरोपीवर बलात्कारासह विविध कलमानुसार आणि पोक्सो कायद्या अंर्तगत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या प्रकरणी तपास करत होते दरम्यान आरोपीने मित्राच्या घरी विश प्राशान करत आत्महत्या केली. या घटनेनंतर मुरबाड येथील गावात एकच खळबळ उडाली आहे.



संबंधित बातम्या