ठाणे न्यायालयात आरोपीने न्यायाधीशांना चप्पल मारून केला शिवीगाळ, वाचा नेमकं घडलं काय
ठाणे न्यायालयात सुनावणी दरम्यान आरोपीने रागात येऊन चक्क न्यायधिशांनाच चप्पल फेकून मारली आहे, इतकंच नव्हे तर आरोपीने शिवीगाळ करत नायालयीन परिसार्ट मोठा गदारोळ केल्याचे सुद्धा समजत आहे.
ठाणे: चोर तो चोर वर शिरजोर! ही म्हण तुम्ही ऐकली असेलच, पण याचं खरोखरं उदाहरण आज ठाणे न्यायालयात (Thane Court) पाहायला मिळालं आहे. सुनावणीच्या वेळी आरोपीने थेट न्यायाधीशांवर पायातील चप्पल फेकून मारल्याची खळबळजनक घटना ठाणे न्यायालयात घडली आहे. या आरोपीचे नाव गणेश गायकवाड (Ganesh Gaikwad) असे असून त्याला शुक्रवारी दुपारी पोलिस बंदोबस्तात ठाणे न्यायालयातील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेश गुप्ता (Justice Rajesh Gupta) यांच्या न्यायालयात सुनावणीसाठी हजर करण्यात आले होते. यावेळी त्याने खटल्याच्या तारीखेवरून न्यायधीशांशी हुज्जत घालत वाद सुरु केला. व त्यानंतर काही वेळाने गणेशने चक्क न्यायाधीशांच्या दिशेने चप्पल फेकून मारली. एवढे सुद्धा कमी की काय म्हणून नंतर त्याने न्यायधीशांना शिवीगाळ करायला सुरवात केली.
मटाने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी गणेशला कारवाईकरिता कोर्टात आणण्यात आले, त्यावेळी त्याचे सरकारी वकील उपस्थित नव्हते यावरून गणेशचा पारा चदला होता. कोर्टाने आपल्याला स्वतःच देऊ केलेला वकील कसा काय अनुपस्थ राहू शकतो, असा सवाल गणेशने केला,याची दखल घेत न्यायाधीशांनी सुनावणीकरिता पुढचे तारीख देतो असे सांगितले, हे ऐकताच गणेशचा स्वतःवरचा ताबा सुटला आणि त्याने थेट आपल्या पायातील चप्पल काढून न्यायाधीशांना फेकून मारली. त्यानंतर त्याला बाहेर नेण्यात आले पण कोर्टाच्या बाहेर सुद्धा तो न्यायधीशांना शिवीगाळ करत होता.या प्रकरणी न्यायालयातील शिपायाने दिलेल्या तक्रारीनंतर सायंकाळी ठाणेनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा- मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिला पुन्हा एकदा कोर्टाकडून समन्स
दरम्यान, आरोपींकडून न्यायाधीशांवर चप्पल फेकण्याचे यापूर्वी देखील ठाणे आणि भिवंडी न्यायालयात प्रकार घडलेले आहेत. जानेवारीमध्ये अश्रफ वैजुजमा अंसारी याने न्यायाधीशांवर चप्पल भिरकावली होती. मात्र न्यायाधीशांना चप्पल लागली नव्हती.