Thane: मुस्लिम महिला आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हिजाबवरुन हाणामारी

तर काँग्रेसच्या कल्याण जिल्ह्याच्या अध्यक्षा कांचन कुलकर्णी यांनी कर्नाटक सरकार आणि भाजपच्या हिजाबाच्या विरोधात आंदोलन बोलावले होते.

Image used for representational purpose only (Photo Credits: PTI)

Thane: ठाण्यातील कल्याण येथे मुस्लिम महिला आणि काँग्रेसच्या महिलांकडून हिजाबच्या विरोधातील आंदोलनावेळी हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. तर काँग्रेसच्या कल्याण जिल्ह्याच्या अध्यक्षा कांचन कुलकर्णी यांनी कर्नाटक सरकार आणि भाजपच्या हिजाबाच्या विरोधात आंदोलन बोलावले होते. त्यावेळीच हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.(Hijab Controversy: हिजाब विवादाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील उच्च शिक्षण विद्यापीठे आणि महाविद्यालये 16 फेब्रुवारीपर्यंत बंद)

आंदोलनादरम्यान, काही मुस्लिम महिला या हिजाब घालून आंदोलनाच्या ठिकाणी आल्या. तेथे येत त्यांनी काँग्रेसकडून या मुद्द्यावर राजकरण केले जात असल्याचा आरोप केला. त्याचवेळी काही महिला आणि आंदोलनकर्त्या महिलांमध्ये वाद झाला आणि त्याला हाणामारीचे वळण लागले.(Hijab Controversy: हिजाब प्रकरणी सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; राष्ट्रीय पातळीवरील मुद्दा बनवू नका - SC)

Tweet:

हिजाब घातलेल्या महिलेने आंदोलनकर्त्यांवर निशाणा साधत म्हटले की, हिजाब घालणे हा आमचा हक्क आहे. पण काँग्रेस यावर राजकरण करत आहे. मोठ्या प्रमाणात महिला एकत्रित आल्याने वाहतूक कोंडी सुद्धा झाली. या घडत असलेला प्रकार पाहता पोलिसांनी तेथे धाव घेत मुस्लिम महिलांना तेथून हटवले.

कांचन कुलकर्णी यांनी असा आरोप लावला की, काही महिलांना आमच्या आंदोलनात व्यत्यय आणण्यासाठी पाठवले होते. तसेच त्या महिला नेमक्या कोठून आल्या याबद्दल ही काही माहिती नाही. याप्रकरणी आम्ही तक्रार करणार असल्याचे ही त्यांनी म्हटले.