TMC Demolishes Cat Shelter: ठाणे मनपाने मांजर निवारा शेड पाडले, 150 मांजरी बेपत्ता; प्राणीमित्रांमध्ये संताप (Watch Video)
ज्यामुळे प्राणीप्रेमींमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. पालिकेने ठाणे पाच पाखाडी (Panch Pakhadi) परिसरात मुसळधार पाऊस सुरु असतानाच मांजर निवारा शेड पाडून (Cat Shelter Demolishes) टाकले आहे. ज्यामुळे या निवारा केंद्रात असलेल्या शेकडो मांजरी बेघर झाल्या.
ठाणे महानगरपालिकेने (TMC) एक धक्कादायक पाऊस उचलले आहे. ज्यामुळे प्राणीप्रेमींमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. पालिकेने ठाणे पाच पाखाडी (Panch Pakhadi) परिसरात मुसळधार पाऊस सुरु असतानाच मांजर निवारा शेड पाडून (Cat Shelter Demolishes) टाकले आहे. ज्यामुळे या निवारा केंद्रात असलेल्या शेकडो मांजरी बेघर झाल्या. प्राप्त माहितीनुसार, ही कारवाई करण्यात आली तेव्हा या शेडमध्ये सुमारे 200 मांजरी नवासास होत्या. त्यापैकी कारवाईनंतर तब्बल 150 मांजरी बेपत्ता आहेत. टीएमसी कर्मचारी कचराळी तलाव बाग परिसरात आले आणि त्यांनी कारवाई केली.
मांजरी बेघर
स्थानिक प्राणीप्रेमी सपना पांडे यांनी टीएमसीला प्रतिक्रिया देताना म्हटले की, बुधवारी, मुसळधार पाऊस पडत होता, तेव्हा काही TMC कर्मचारी ठाणे शहरातील पाच पाखाडी येथील कचराळी तलाव बागेत आले. त्यांनी आम्ही ज्या शेडमध्ये सुमारे 200 मांजरे ठेवतो आणि त्यांची काळजी घेतो ते शेड पाडून टाकले. पालिकेच्या या कारवाईमुळे मांजरी बेघर झाल्या. धक्कादायक म्हणजे आतापर्यंत आम्हाला 150 मांजरींचा शोध लागला नाही. त्या अजूनही बेपत्ताच आहेत. (हेही वाचा, Cat And Kittens: जीव वाचताच मांजर पळाली, पण पिल्लांसाठी परत आली; मुंबईकरांनी पाहिले मातृप्रेम)
प्राणीमित्रांमधील चिंता कायम
दरम्यान, पालिकेवर होत असलेल्या टीकेला प्रतिक्रिया देताना TMC अधिकाऱ्याने म्हटले की, आम्ही कारवाई केली. मात्र, मांजरींना सुरक्षीत ठेवण्याचे उपाय सुरु आहेत. तात्पूरते ताडपत्री शेड उभारुन त्यांना निवारा उपलब्ध करुन देण्याचे काम सुरु आहे. पालिका अधिकाऱ्यांनी मांजरींच्या सुरक्षेबाबत आश्वासन दिले असले तरी प्राणीमित्रांमधील चिंता कायम आहे. या मांजरींना कायमस्वरुपी निवारा कसा उपलब्ध करुन द्यावा याबाबत त्यांना चिंता सतावते आहे. ही त्यांची चिंता कायम आहे. (हेही वाचा, Funeral On a Pet Cat: पाळीव मांजरावर नागरी स्मशनभूमीत अंत्यसंस्कार, सहा जणांवर गुन्हा दाखल)
व्हिडिओ
प्राणी प्रेमी सपना पांडे यांनी फ्री प्रेस जर्नलशी बोलताना सांगितले की, तिने मांजरींच्या संरक्षणासाठी ठाणे महानगरपालिकेकडून (TMC) तीन ताडपत्री पसरवण्यासाठी "मौखिक परवानगी" घेतली होती. त्यामुळे या मांजरींना तिने ताडपत्रीखाली ठेवण्यासाठी लाकडी पेटी ठेवली होती. या भटक्या प्राण्यांना पावसापासून सुरक्षा मिळविण्यासाठी पुरेशी जागा आणि सुरक्षित निवारा नसल्याने त्यांना तत्पूरता आडोसा/निवारा उभारला होता. मी टीएमसीला आश्वासन दिलं होतं की, पावसाळा संपल्यावर सप्टेंबरमध्ये मी तो निवारा हटवेन आणि मांजरींनाही दूर घेऊन जाईन. दरम्यान,मला हे पाहून धक्का बसला की, काल TMC मधील कोणीतरी निष्पाप प्राण्यांचा निवारा उखडून टाकला होता. ज्यामुळे हे प्राणी उघड्यावर आले होते. मी 25 मांजरींना वाचवू शकलो. परंतु उर्वरित 185 मांजरी बेपत्ता आहेत. पालिकेने या मांजरींसाठी काहीतरी करावे ही आमची इच्छा असल्याचेही त्या म्हणाल्या.