ठाणे: तलावपाळी येथे सापडला 24 वर्षीय तरुणीचा मृतदेह; पोलीस तपास सुरु
ठाणे शहरातील प्रसिद्ध स्पॉट तलावपाळी येथे आज, 22 डिसेंबर रोजी सकाळी एका 24 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला आहे, याबाबत स्थानिकांमार्फत माहिती समोर आली असून तूर्तास ही तरुणी कोण याचा पोलीस तपास करीत आहेत.
ठाणे (Thane) शहरातील प्रसिद्ध स्पॉट तलावपाळी (Talav Pali) येथे आज, 22 डिसेंबर रोजी सकाळी एका 24 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला आहे, याबाबत स्थानिकांमार्फत माहिती समोर आली असून तूर्तास ही तरुणी कोण याचा पोलीस तपास करीत आहेत. सकाळच्या सुमारास तलावपाळी परिसरात अनेक मंडळी जॉगिंग निमित्त येत असतात त्यातील काहींची या मृतदेहावर नजर पडली त्यानंतर परिसरात खळबळ माजली असताना काही दक्ष नागरिकांनी पोलिसांना बोलावून यासंदर्भात माहिती दिली, ठाणे पोलिसांनी (Thane Police) हा मृतदेह सध्या ताब्यात घेतला असून सविस्तर तपास सध्या सुरु आहे.
प्राथमिक अंदाजानुसार या तरुणीने तलावात उडी मारून आत्महत्या केली असावी असे पोलिसांचे म्हणणे आहे मात्र या मागील कारण अद्याप समोर आलेले नाही. ठाणे: कळवा पुलावर 40 वर्षीय व्यक्तीचा गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांनी वाचवले 'हायड्रा'च्या मदतीने प्राण (Watch Video)
ANI ट्विट
Thane: Body of a 24-year old woman found in Talao pali. Body handed over to Police. Further investigation underway. #Maharashtra
— ANI (@ANI) December 22, 2019
काही आठवड्यांपूर्वी माहीमच्या समुद्र किनाऱ्यावर एका बेवारस सुटकेसमध्ये पुरुषाच्या हातपायांचे तुकडे आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. माहीम दर्ग्याच्या पाठिमागच्या बाजूला काही तरुणांना ही सुटकेस दिसली. सुटकेस जड लागल्यामुळे या तरुणांनी ती उघडून पाहिली असता त्यात हा धक्कादायक प्रकार समोर आला.
याशिवाय अशाच प्रकारची एक घटना कल्याण स्थानकात देखील या महिन्याच्या सुरुवातीला समोर आली होती.कल्याण स्थानकात एका सुटकेसमध्ये स्त्रीच्या शरीराचे तुकडे सापडले होते . ही सुटकेस ठेवणारी व्यक्ती सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये कैद झाली होती.यातही शरीराचा केवळ कंबरेपासून खालचा भाग मिळाला आहे. धड आणि शीर गायब असून आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
दरम्यान, ठाणे येथे सापडलेल्या मृतदेहाचा आणि एकूणच प्रकरणाचा पोलीस तपास घेत असून सविस्तर माहिती अद्याप हाती आलेली नाही.
(The above story first appeared on LatestLY on Dec 22, 2019 11:58 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

