2.5 Crore Rupees Found In Thane: रिक्षावाल्याला अडीच कोटी रुपये सापडले, पण तुम्हाला वाटतंय तसं काहीच नाही घडले; घ्या जाणून

होय, ठाणे शहरातील कॅडबरी जंक्शन येथील कॅडबरी कंपनीच्या फाटकाजवळ एका रिक्षावाल्याला चक्क पैशांनी भरलेली बॅग सापडली. या बॅगमध्ये चक्क अडीच कोटी रुपये (2.5 Crore Rupees Found In Thane) होते. आता सहाजिक आपण म्हणाला असाल रिक्षावाला ( Autorickshaw Driver) मालामाल झाला. पण तसे काहीच घडले नाही.

Money. Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

Thane: अचानक लॉटरी लागावी, काहीतरी घबाड मिळावे किंवा काहीतरी जादू घडून आपण खूप श्रीमंत व्हावे, असे एक ना अनेक विचार अनेकांच्या मनात येतात. पण हे विचार कधी खरे झालेत का? अपवाद वगळता नाहीच नाही. पण, ठाणे शहरातील एका रिक्षावाल्याच्या बाबतीत मात्र हे काहीसे खरे ठरले आहे बरं. होय, ठाणे शहरातील कॅडबरी जंक्शन येथील कॅडबरी कंपनीच्या फाटकाजवळ एका रिक्षावाल्याला चक्क पैशांनी भरलेली बॅग सापडली. या बॅगमध्ये चक्क अडीच कोटी रुपये (2.5 Crore Rupees Found In Thane) होते. आता सहाजिक आपण म्हणाला असाल रिक्षावाला ( Autorickshaw Driver) मालामाल झाला. पण तसे काहीच घडले नाही. या रिक्षावाल्याने ही बॅग थेट पोलिसांनाच नेऊन दिली.

रिक्षावाल्याने दिलेली बॅग पोलिसांनी उघडून पाहिली. पण त्यानंतर पोलीसही चक्रावले. कारण या बॅगमध्ये अडीच लाख रुपये होते खरे. पण त्याचा काहीच उपयोग नव्हता. कारण या बॅगमध्ये पैसै होते खरे. पण त्या सगळ्या झेरॉक्स होत्या. बॅगमध्ये वरच्या बाजूला पाचशे रुपयांच्या काही नोटा होत्या खऱ्या पण बाकीच्या सर्व नोटा या पैशांच्या झेरॉक्स होत्या. हा प्रकार पाहून पोलीसही चक्रावले आणि नाक्यानाक्यावर रिक्षावाल्यांमध्येही वेगळीच चर्चा सुरु झाली. चहाची टपरी, नाके आणि चौकांमध्ये याघटनेबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. (हेही वाचा, Saving vs Investing: पैसा वाढवा यासाठी काय करावे? साठवावेत की गुंतवावेत? घ्या जाणून)

चलनी नोटांच्या झेरॉक्स कोणी काढल्या असतील? आणि जर काढल्याच असतील तर त्या इतक्या प्रमाणावर का काढल्या असतील. त्यातही नंतर त्या बॅगेत भरुन का टाकल्या असतील. जर कोणी काही कामासाठी त्या झेरॉक्स काढल्या असतील तरी त्यासोबत 500 रुपयांच्या खऱ्या नोटा का ठेवल्या असतील? अशा एक ना अनेक प्रश्न या घटनेमुळे उपस्थित केले जात आहेत. रिक्षावाल्याने तर ही बॅग पोलिसांच्या स्वाधीन केली. मात्र, आता पोलिसांसमो आव्हान आहे की, ही बॅग ठेवणारा नेमका कोण आहे आणि त्याने हे कृत्य का केले. या सर्व प्रश्नांच्या उत्तरांसाठी पोलीस सीसीटीव्ही फूटेज तपासत असल्याचे समजते.