ठाणे: मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या गर्भवती महिलेची रेल्वेस्थानकातील वन रुपी क्लिनिकमध्ये सुखरुप प्रसुती
सदर महिला कर्जत ते परेल या मार्गाने प्रवास करत होती.
मुंबईच्या लोकलने प्रवास करणाऱ्या एका गर्भवती महिलेने बाळाला रेल्वेस्थानकात वैद्यकिय उपचारासाठी सुरु करण्यात आलेल्या वन रुपी क्लिनिक मध्ये जन्म दिला आहे. सदर महिला कर्जत ते परेल या मार्गाने प्रवास करत होती. मात्र अचानक प्रसुती कळा सुरु झाल्याने तिला स्थानकातील वन रुपी क्लिनिकमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.सदर महिलेने एका नवजात बालकाला जन्म दिला असल्याची घटना आज (10 ऑक्टोंबर) सकाळी घडली आहे. तर आई आणि बाळ दोघेही सुखरूप असल्याचे सांगण्यात आले आहे.
मुंबई लोकलमध्ये प्रसुतीकळा सुरु होऊन नवजात बालकांना यापूर्वी ही महिलांनी जन्म दिल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र रेल्वे स्थानकात असलेल्या वन रुपी क्लिनिकमुळे गर्भवती महिलांना येथून उपचार करणे सोपे झाले आहे. तर आज पुन्हा एकदा ठाणे स्थानकात लोकलने प्रवास करणाऱ्या एका महिलेने बाळावा जन्म दिला आहे. (अबब! ३८ मुलांची आई आहे ३९ वर्षांची महिला, १३ व्या वर्षी दिला होता पहिल्या बाळाला जन्म)
या आधी महिला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ठाणे येथे जाण्यासाठी निघाली होती. त्यावेळी तिच्या पोटात अचानक दुखू लागले. परंतु प्रवासादरम्यानच तिची प्रसुती झाली होती. तसेच गर्भवती महिलांना लोकलमध्ये गर्दी असल्यास प्रवास करु नये असे आवाहन करण्यात येते.
तर इशरत नावाच्या महिलेला सुद्धा पोटात दुखायला लागले म्हणून तिला स्थानकातील वन रुपी क्लिनिक मध्ये उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी ही इशरत यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला होता. त्या आंबिवली ते कुर्ला असा रेल्वेने प्रवास करत असताना ती घटना घडली होती.