ठाणे येथे एका दिवसात 12 हजार COVID19 च्या रुग्णांची प्रकृती सुधारली, हॉटस्पॉट वगळता अन्य ठिकाणी लॉकडाऊन उठवला
मात्र याच दरम्यान आता ठाणेकरांसाठी एक दिलासादायल बातमी आहे. कारण ठाण्यात एकाच दिवशी जवळजवळ 12 हजार कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती सुधारुन डिस्चार्ज देण्यात आला आहे.
ठाणे (Thane) येथे कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र याच दरम्यान आता ठाणेकरांसाठी एक दिलासादायल बातमी आहे. कारण ठाण्यात एकाच दिवशी जवळजवळ 12 हजार कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती सुधारुन डिस्चार्ज देण्यात आला आहे. पहिल्यांदाच ऐवढ्या संख्येने रुग्णांची प्रकृती सुधारल्याचे ही दिसून आले आहे. सध्या ठाण्यात 5324 अॅक्टिव्ह कोरोनाचे रुग्ण असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. तसेच 9645 जणांची प्रृती सुधारुन त्यांना डिस्चार्ज दिला गेला आहे.
शनिवारी ठाण्यात आणखी 342 कोरोनासंक्रमित रुग्णांची नोंद झाल्याने आकडा 15,516 वर पोहचला आहे. तर 10 जणांचा सुद्धा काल बळी गेल्यानंतर मृतांचा एकूण आकडा 547 वर पोहचला आहे. तर मृतांचा आकडा कमी झाला असला तरीही कोरोनाच्या रुग्णांचा आकडा दिवसाला 350 प्रमाणे वाढत आहे. आतापर्यंत महापालिकेकडून 60 हजार चाचण्या पार पाडण्यात आल्या आहेत.(COVID19 Cases In Pune: पुण्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत आणखी वाढ; जिल्ह्यात आज 1 हजार 838 रुग्णांची नोंद, 18 जणांचा मृत्यू)
कोरोनाचे नव्याने आढळून आलेले रुग्ण हे माजिवाडा-मानपाडा मधील 56, कळव्यातील 55, नौपाडा-कोपरी येथील 52, उथलसर येथे 41, लोकमान्य-सावरकर मध्ये 34, दिव्यात 31, वर्तक नगर मध्ये 30, वाघळे इस्टेट मध्ये 23 आणि मुंब्रात 19 रुग्णांची नोंद झाली आहे. ठाणे आणि कल्याण येथे 15 हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर नवी मुंबईत 11 हजारांच्या पार रुग्णांचा आकडा गेला आहे.(Coronavirus Cases In Maharashtra: महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांनी ओलांडला 3 लाखांचा टप्पा; आज 8,348 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, तर 144 जणांचा मृत्यू)
तर ठाणे महापालिकेने कोरोनोचे हॉटस्पॉट वगळून अन्य ठिकाणी लॉकडाऊन उठवण्याचा निर्णय घेतला आहे. तर कोरोनाच्या वाढत्या रुग्णांनुळे महापालिकेने 10 जुलै पर्यंत बंदचे आदेश दिले होते. कोरोनाच्या हॉटस्पॉटचे ठिकाण सोडून अन्य ठिकाणी काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी देण्यात आली होती. तसेच दुकाने पहिल्या, दुसऱ्या टप्प्यानुसार सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत.