Gaurav Kotgire Kidnapped Case: ठाकरे गटाचे नांदेड शहरप्रमुख गौरव कोटगिरे यांचे अपहरण; अवघ्या 4 तासांतचं सुटका, काय आहे नेमक प्रकरण? वाचा

मात्र, काही तासांनंतर त्यांची सुटका करण्यात आली. नांदेडमधील बाफना परिसरात ही घटना घडली.

kidnapping प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य - Pixabay)

Gaurav Kotgire Kidnapped Case: नांदेडमध्ये शिवसेना (UBT) नेत्याचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवून घटनेचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी सांगितले की, नांदेड शिवसेना यूबीटी नेते गौरव कोटगिरे (Gaurav Kotgire) यांचे शुक्रवारी रात्री काही मुखवटाधारी लोकांनी अपहरण (Kidnapping) केले. मात्र, काही तासांनंतर त्यांची सुटका करण्यात आली. नांदेडमधील बाफना परिसरात ही घटना घडली.

पोलिसांनी सांगितले की, गौरव कोटगिरे हे त्याच्या गॅरेजमध्ये काम करत असताना त्याला जबरदस्तीने एसयूव्हीमध्ये बसवून अज्ञात ठिकाणी नेण्यात आले. काही तासांनंतर त्यांची सुटका करण्यात आली, त्यानंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. शिवसेना यूबीटी नेत्याने दावा केला की आरोपींनी त्यांचे चेहरे झाकले होते. तसेच आरोपींनी त्यांना शस्त्र दाखवून धमकावले होते. (हेही वाचा - Sunanda Pawar: 'मूठ घट्ट असेल तर त्याची ताकद वाढते'; शरद पवार-अजित पवार एकत्र येण्यावर सुनंदा पवार यांचं मोठं वक्तव्य)

दरम्यान, आरोपींनी गौरव कोटगिरे यांना राजकारण आणि मालमत्तेच्या व्यवहारात जास्त भाग घेऊ नका आणि इतर नेत्यांबद्दल वाईट बोलू नका अशी धमकी दिली. नांदेडच्या इतवारा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, भारतीय न्याय संहितेअंतर्गत अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. (Nana Patole's Letter To Mallikarjun Kharge: मला पदमुक्त करा..! नाना पटोले यांचे मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र)

अवघ्या काही तासांतचं अपहरणकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या शहर प्रमुखाला सोडून दिले. गौरव कोटगिरे यांचे खरचं अपहरण होते की हा स्टंट होता? याचा तपास पोलीस करीत आहेत. तथापी, गौरव कोटगिरे यांच्या तक्रारीवरून पाच ते सहा अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.