Pune Accident: नवले पुलावर भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू, तीन वाहनांची धडक

दरम्यान पुलाखाली खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे.

Accident | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Pune Accident: पुण्यातील नवले पुलावर अपघाताची मालिका सुरुच आहे. दरम्यान पुलाखाली खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातात तीन वाहनं एकमेकांना धडकल्याची माहिती समोर येत आहे. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल होताच, तपासणी सुरु केली आहे. या विचित्र अपघातामुळे रस्त्यावर गोधंळाची परिस्थिती निर्माण झाली. (हेही वाचा- उन्हाचा पारा वाढला)

मिळालेल्या माहितीनुसार, पुलाखालून जात असताना, बस आणि ट्रकची एकमेकांना धडक झाली. ट्रक अनियंत्रित झाल्याने बसला आढळली आणि त्याच रस्त्यावरून जाणाऱ्या एका वाहनाची धडक लागली. या भीषण धडकेत एकाचा मृत्यू जागीच झाला. रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी मृताला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी आले आणि तपासणी सुरु केली. मृताला पोलिसांना ताब्यात घेतले. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अपघातात ट्रक आणि बसचे संपुर्ण नुकसान झाले आहे.

जळगावातील कारचा अपघात

हा अपघात जळगाव - धरणगाव रोडवर मुसळी ते चिंचपुरा गावा दरम्यान घडला होता. पुलाखालून जात असताना कारवरिल चालकाचं नियंत्रण सुटलं. कार अनियंत्रित झाल्यामुळे थेट एका मोठ्या झाडावर धडकली. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला. आणखी एकाला छातीत जबर मार लागल्याची माहिती समोर आली. मृत कार चालकाचे नाव राज शिरसाट होते. तर सार्वेकर महाराजा गंभीर जखमी झाले होते.