महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2019: पाहा महाराष्ट्रातील निकालावर PM Narendra Modi यांनी काय दिली पहिली प्रतिक्रिया
महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला 103 जागांवर विजय मिळाला आहे तर शिवसेनेने 56 जागी मुसंडी मारत विजय संपादन केला आहे.
संपूर्ण देशाचे लक्ष ज्याकडे होते अशा महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांचे आज निकाल जाहीर झाले आहेत. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला 103 जागांवर विजय मिळाला आहे तर शिवसेनेने 56 जागी मुसंडी मारत विजय संपादन केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेत भाजपला (BJP) महाराष्ट्रात जनतेकडून मिळालेल्या पाठिंब्याचे आभार मानले. तसेच महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री हा महायुतीचाच होणार असल्याचा निर्णय दिला आहे.
अनेकांना निकालानंतर प्रतीक्षा होती ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिक्रियेची. मोदींनी आपली पहिली प्रतिक्रिया ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
पाहा ट्विट,
मोदींनी आपल्या ट्विट मध्ये लिहिले की, 'महाआघाडीला महाराष्ट्राच्या जनतेने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आमचं काम सुरूच राहणार. भाजप, शिवसेना आणि महाआघाडीतल्या प्रत्येक कार्यकर्त्याचे त्याच्या मेहनतीबद्दल आभार'.
विधानसभा निवडणूकीसाठी महाराष्ट्रात 288 जागांवर भाजपने 164 जागा आणि शिवसेनेने 288 जागांवर निवडणूक लढवली. तर उर्वरित जागा मित्रपक्षांसाठी सोडण्यात आल्या होत्या.