भंडारा: आणखी एका वाघिणीचा मृतदेह सापडला; दोन दिवसात दोन वाघांचा मृत्यू
उमरेड अभयारण्यात आज एका वाघिणीचा मृतदेह सापडला आहे.
भंडारा जिल्ह्यातील उमरेड अभयारण्यात (Umred Sanctuary) आज (सोमवार, 31 डिसेंबर) एका वाघिणीचा मृतदेह सापडला आहे. कालच या ठिकाणी एक वाघ मृतावस्थेत आढळून आला होता. सलग दोन दिवसात दोन वाघांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
वन विभागाच्या शोध मोहिमेत वाघिणीचा मृतदेह आढळून आला. 'टी 4' असे या मृत वाघिणीचे नाव आहे. वाघिणीच्या मृतदेहाशेजारीच मृत डुक्कराचे अवशेषही सापडले आहेत.
काल उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील चार्जर वाघाचा मृत्यूदेह सापडला होता. 'चार्जर' हा 'जय' या वाघाचा बछडा होता. या दोन्ही वाघांवर विषप्रयोग करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज लावण्यात येत आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Tiger Attacks: चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; 10 मेपासून आतापर्यंत आठ लोकांनी गमावला आपला जीव
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Gayatri Hazarika Passes Away: प्रसिद्ध आसामी गायिका गायत्री हजारिका यांचे कर्करोगाने निधन; 44 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Dog Attack In Ahmedabad: रॉटविलर कुत्र्याचा 4 महिन्यांच्या मुलीवर हल्ला; चिमुरडीचा मृत्यू, पहा व्हिडिओ
Advertisement
Advertisement
Advertisement