Sanjay Karle: पॅरोलवर सुटलेला कैदी संजय कार्ले याचा संशयास्पद मृत्यू; मुंबई गोवा महामार्गावर आलिशान चारचाकीत आढळला मृतदेह

लाल रंगाच्या ऑडी कारमध्ये आढळेल्या या मृतदेहाची ओळख पटली आहे. हा मृतदेह संजय कार्ले याचा आहे. संजय कार्ले (Sanjay Karle) हा कुख्यात गुन्हेगार आहे.

Sanjay Karle | Representational Image (Photo Credits: Pixabay)

मुंबई गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway) पनवेल नजीक एका आलीशान कारमध्ये (Luxury Car) बेवारस मृतदेह (Suspicious Death) आढळून आला आहे. लाल रंगाच्या ऑडी कारमध्ये आढळेल्या या मृतदेहाची ओळख पटली आहे. हा मृतदेह संजय कार्ले याचा आहे. संजय कार्ले (Sanjay Karle) हा कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल असून, तो तुरुंगात होता. नुकताच तो पॅरोलवर बाहेर आला होता. पॅरोलवर असतानाच त्याचा संशयास्पद मृत्यू (Sanjay Karle Suspicious Death) झाल्याने खळबळ उडाली आहे. मृतदेह ऑडी कारपर्यंत कसा पोहोचला याबाबत पोलीस सध्या तपास करत आहेत.

महामार्गावर उभ्या असलेल्या आलिशान कारमध्ये मृतदेह असल्याची घटना प्रथम स्थानिकांच्या लक्षात आली. महामार्गावर एकाच ठिकाणी एक बेवारस कार दोन दिवसांपासून उभी होती. आलीशान कार दोन दिवसांपासून एकाच ठिकाणी असल्याने स्थानिकांचा संशय वाढला. त्यांनी कारजवळ जाऊन पाहिले असता त्यांना एक मृतदेह आढळून आला. त्यानंतर त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांच्या प्राथमिक तपासात संजय कार्ले या व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या झाल्याचे समोर आले आहे. मृताच्या छातीवर आणि पोटावर गोळ्यांच्या खुणा आहेत. पोलीस अधिक तपास करत आहेत. (हेही वाचा, Pune Shocker: धक्कादायक! पुण्यात मित्राची हत्या करून मृतदेह जाळला; ब्लूटुथच्या मदतीने आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश)

प्राप्त माहितीनुसार, संजय कार्ले हा मूळचा पुणे जिल्ह्यातील दाभाडे येथील रहिवासी होता. सोन्याची बनावट नाणी विकण्याचा व्यवसाय तो करायचा. या व्यवसायातून त्याने अनेकांची फसवणूक केली होती. त्यामुळे त्याच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हेही दाखल होते. खास करुन त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई झाली होती. पोलिसांनी सध्या त्याला अटक केली होती. परंतू, सहा महिन्यापूर्वीच तो पॅरोलवरती बाहेर आला होता. दरम्यान, त्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

ट्विट

पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना सांगितले की, संजय कार्ले याची हत्या झाल्याचे प्रथमदर्शनी दिसते. मृतदेहाच्या छातीवर व पोटावर जखमा होत्या. पुढील तपास सुरु आहे.