Sushant Singh Rajput Case: सुशांत सिंह राजपूत याची हत्या झाली, भाजप खासदार नारायण राणे यांचा दावा

भ्रष्टाचार करणे हेच केवळ सरकारचे काम आहे. मात्र, विरोधी पक्ष हा लोकशाही माणणारा पक्ष आहे. त्यामळे विरोधी पक्ष हा सरकारला जाब विचारेन, असेही राणे या वेळी म्हणाले.

BJP MP Narayan Rane on Sushant Singh Rajput Case | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

अभिनेता सुशांत सिह राजपूत (Sushant Singh Rajput Case) आत्महत्या प्रकरणात भाजप ((BJP)) खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी खळबळजनक दावा केला आहे. सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केली नाही. तर, त्याची हत्या करण्यात आल्याचा दावा नारायण राणे यांनी केला आहे. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. नारायण राणे यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणात महाराष्ट्र सरकारवरही निशाणा साधला. राज्यातील महाविकासआघाडी सरकार हे सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण काळजीपूर्वक हाताळत नाही. ते कोणालातरी वाचवत आहेत असेही राणे या वेळी म्हणाले.

दरम्यान, अभिनेता दिनो मेरियो याच्या घरी अनेक मंत्री का जमतात असा सवालही राणे यांनी उपस्थित केला. हे सरकार हे केवळ गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे. भ्रष्टाचार करणे हेच केवळ सरकारचे काम आहे. मात्र, विरोधी पक्ष हा लोकशाही माणणारा पक्ष आहे. त्यामळे विरोधी पक्ष हा सरकारला जाब विचारेन, असेही राणे या वेळी म्हणाले. (हेही वाचा,Sushant Singh Rajput Death Probe: सुशांत सिंह राजपूत प्रकरण सीबीआयकडे हस्तांतरीत करण्याबाबतची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाने पुढे ढकलली )

शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि शिवसेना नेते वरुण देसाई यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. या टीकेला आपण उत्तर देत आहोत. वरुण देसाई हे ठाकरे कुटुंबीयांच्या जवळचे आहेत. लवकरच त्यांना आमदारकी मिळेल. चतुर्वेदी यांना खासदारकी मिळाली आहे. त्यामुळे ते अमृता यांच्यावर टीका करत आहेत. परंतू, शिवसेनेचे बाकीचे नेते बाजूला करुन वरुण सरदेसाई यांना पुढे केले जात आहे. मी शिवसेनेत असताना हे नव्हते, असेही राणे म्हणाले. तसेच, वरुण सरदेसाई आणि प्रियंका चतुर्वेदी यांनी अमृता फडणवीस यांची माफी मागावी, अशी मागणीही नारायण राणे यांनी केली.