Sushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंग राजपुत मृत्यू प्रकरणात उपमुख्यमंत्रीनी दिली प्रतिक्रिया, सीबीआय पुरावे लवकरच उडेजात आणेल ?

त्यामुळे सुशांत सिंगचा चाहता वर्ग त्याला कधी न्याय मिळणार असल्याचे प्रशासनाला विचारत असतो.

Devendra Fadnavis On sushant singh death case (Photo credit FB/Insta)

Sushant Singh Rajput Death Case: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूत  (Sushant Singh Rajput)आणि दिशा सालियन (Disha Salian) यांच्या मृत्यू प्रकरणाबद्दल नुकत्याच एका मुलाखतीत मोठी अपडेट दिली आहे. 14 जून 2020 रोजी सुशांतचा मृत्यू झाला आणि या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता, गेल्या तीन वर्षांपासून सुशांतच्या मृत्यू प्रकरणी कोणतीही माहिती समोर आली नाही. सुशांतच्या मृत्यू प्रकरणी अनेक बॉलिवूड कलाकारांची नावे समोर आली होती आणि त्यासंर्दभात चौकशी करण्यात आली होती.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुशांत सिंग मृत्यू प्रकरणी प्रतिक्रीया दिली आहे. सुशांतचा सोशल मीडियावर चाहता वर्ग मोठा आहे. त्यांचा चाहता वर्ग सुशांतला न्याय कधी मिळणार असल्याचे प्रश्न विचारत असतो. याच प्रकरणाला धरुन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. सीबीआय पुरावे गोळा करत आहे.त्यांच काम वेगाने करत आहे. पुरावे जमा झाले की लवकरच त्यांना उजेडात आणू,पुरावे आले की त्याची तपासणी केली जाईल.

अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी आतापर्यंत उपलब्ध असलेले पुरावे बरोबर आहेत की नाही, हे देखील तपासले जात आहे. या प्रकरणात जी काही माहिती उपलब्ध होती ती ऐकीव माहिती होती, असे देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखतीत सांगितले आहे. सुशांत सिंगची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला ह्या प्रकरणात पोलीसांनी काही दिवस तीला कोठडीत ठेवल आणि सुशांतच्या मृत्यू नंतर ड्रग्ज रॅकेट समोर आले होत.