Sushant Singh Rajput Case: हे तर गलिच्छ राजकारण, पण मी संयम बाळगलाय- आदित्य ठाकरे

हे तर गलिच्छ राजकारण, पण मी संयम बाळगलाय', असे म्हटले आहे. तसेच, 'ही टीका म्हमजे एक प्रकारे वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखीच आहे', असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी विरोधकांना आणि टीकाकारांना लगावला आहे.

Aditya Thackeray | (Photo Credits: Facebook)

सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput Case) आत्महत्या प्रकरणात अंगुलीनिर्देश करत टीका करणाऱ्यांना राज्याचे राजशिष्टाचार आणि पर्यटन मंत्री, शिवसेना (Shiv Sena) युवा नेते आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray) यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून एक पत्र शेअर करत आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे की, 'सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी व्यक्तिश: माझ्यावर तसेच ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे. हे तर गलिच्छ राजकारण, पण मी संयम बाळगलाय', असे म्हटले आहे. तसेच, 'ही टीका म्हमजे एक प्रकारे वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखीच आहे', असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी विरोधकांना आणि टीकाकारांना लगावला आहे.

आदित्य ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'कोरोना संकटाने देशभर हाहाकार माजवला आहे. महाराष्ट्राचे सरकारही कोरोनाचा पराभव करण्यासाठी शर्थ करीत आहे. बहुधा, महाराष्ट्र सरकारचे यश, लोकप्रियता ज्यांना खुपते त्यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचे घाणेरडे राजकारण सुरु केले आहे. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी व्यक्तिश: माझ्यावर तसेच ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे. ही एक प्रकारे वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखीच आहे. मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्यचा हा प्रकार माणुसकीला कलंकित करणारा आहे. मुळात या सर्व प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही.'

आदित्य ठाकरे यांनी पुढे आपल्या पत्रात म्हटले आहे की, 'सिनेसृष्टी म्हणजे 'बॉलिवूड' हे मुंबई शहराचे एक महत्त्वाचे अंग आहे. या उद्योगावर हजारोंचे रोजगार अवलंबून आहेत. त्यापैकी अनेकांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध नक्कीच आहेत. हा काही गुन्हा नाही. सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू दुर्दैवी तितकाच धक्कादायक आहे.मुंबई पोलीस या प्रकरणाचा खोलवर तपास करीत आहेत. महाराष्ट्राच्या पोलिसांना जागतिक प्रतिष्ठा आहे. पण, ज्यांचा कायद्यावर विश्वास नाही तेच लोक या प्रकरणी फालतू आरोपांचा धुरळा उडवीत तपास भरकटवण्याचा प्रयत्न करीत आहेत'. (हेही वाचा, Sushant Singh Rajput Case: सुशांत सिंह राजपूत याची हत्या झाली, भाजप खासदार नारायण राणे यांचा दावा)

दरम्यान, 'मी हिंदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा नातू म्हणून सांगू इच्छितो, महाराष्ट्राच्या, शिवसेनेच्या व ठाकरे कुटुंबाच्या प्रतिष्ठेस तडा जाईल असे कृत्य माझ्या हातून कदापी होणार नाही. फालतू आरोप करणाऱ्यांनी हे समजून घेतले पाहिजे. या प्रकरणाची कोणाकडे काही विशेष माहिती असेल तर ती त्यांनी पोलिसांनाच द्यायला हवी. पोलीस नक्कीच त्या दिशेन तपास करतील. या प्रश्न मी आजही संयमानेच वागत आहे. अशा प्रकारे चिखलफेक करुन सरकार व ठाकरे परिवारास बदनाम करता येईल या भ्रमात कोणी राहू नये', असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.

Star Pravah वरील Dr.Babasaheb Ambedkar मालिकेत येणार भावनिक वळण; रमाई घेणार जगाचा निरोप : Watch Video

दरम्यान, भाजप खासदार नारायण राणे यांनी आजच पत्रकार परिषद घेऊन महारष्ट्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केली नाही तर त्याची हत्या झाल्याचा आरोपही नारायण राणे यांनी केला आहे. तसेच, राज्य सरकार मंत्रिमंडळातील एका मंत्र्याला वाचविण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरण गांभीर्याने घेत नाही, असेही आरोप राणे यांनी केले आहेत.