Mumbai: सूरतमधील व्यक्ती 14 वर्षांच्या मुलीसोबत मुंबईतील हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळली; पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
पीडितेच्या कुटुंबीयांच्या जबाबानंतर पोलीस कथीत लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास करत आहेत.
गुजरात राज्यातील सुरत (Surat) येथील 42 वर्षीय व्यक्ती मुंबईतील हॉटेलच्या खोलीत मृतावस्थेत (Surat Man Found Dead in Mumbai) आढळला आहे. धक्कादायक म्हणजे या व्यक्तीसोबत एक 14 वर्षांची अल्पवयीन मुलगीही होती. त्यामुळे हे प्रकरण हत्या किंवा लैंगिक अत्याचाराचे असावे असा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी या घटनेची तातडीने दखल घेतली आहे. लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण (POCSO Act) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन पोलिसांनी (Mumbai Police) तपास सुरु केला आहे. शनिवारी (2 ऑक्टोबर) संध्याकाळी 6:15 च्या सुमारास हॉटेल सुपर येथे ही घटना उघडकीस आली.अतिथी म्हणून आलेली एक व्यक्ती हॉटेलच्या खोलीमध्ये बेशुद्धावस्थेत आढळून आली. त्यांनी व्यवस्थापनास तातडीने संपर्क साधत माहिती दिल्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले.
मृतदेहाची ओळख पटली
मुंबई पोलीस घटनेबाबत माहिती देताना म्हणाले, मृत व्यक्तीची ओळख पटली आहे. संजय कुमार रामजीभाई तिवारी असे या व्यक्तीचे नाव असून, तो मुळचा सुरत येथील रहिवासी आहे. त्याला तातडीने जेजे रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्यास उपचारापूर्वीच मृत घोषीत केले. धक्कादायक म्हणजे हा व्यक्ती हॉटेलच्या ज्या खोलीत होता त्याच्यासोबत एक 14 वर्षांची मुलगीही आढळून आली. ही मुलगी त्याच्या ओळखीची असल्याची प्राथमिक माहिती आहे. (हेही वाचा, Pune Crime: हरवलेली मांजर शोधण्याच्या बदल्यात महिलेकडे लैंगिक सुखाची मागणी; पुणे येथील धक्कादायक प्रकार)
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा दावा
मुलीच्या आईने पोलिसांना माहिती देताना सांगितले की, तिवारी याने तिच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. आईच्या आरोपावरुन पोलिसांनी लैंगिक अत्याचाराच्या गंभीर आरोपांसह बॉम्बे नर्सिंग अँड सॅनिटायझेशन (बीएनएस) कायदा आणि पॉक्सो कायदा कलमांखाली गुन्हा दाखल केला.
पोलीस दप्तरी अपघाती मृत्यूची नोंद
दरम्यान, मुंबई येथील डी.बी. मार्ग पोलीस स्टेशन दप्तरी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर, तिवारी याच्याविरोधात बीएनएस कायद्याच्या अनेक तरतुदींनुसार, विशेषतः कलम 137 (2) 64 (1) 65 (1) 336 (2) 336 (3) आणि 340 (2) अंतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पॉक्सो कायद्याच्या कलम 4,6,8 आणि 10 अंतर्गत अतिरिक्त आरोप नोंदवण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी पुष्टी केली की तपास सुरु आहे आणि तपास जसजसा पुढे जाईल तसतसे अधिक तपशील समोर येतील. (हेही वाचा, Unnatural Sexual Assault Ahmednagar: 11 वर्षीय मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार, अहमदनगर येथे नऊ जणांवर गुन्हा दाखल)
तपासादरम्यान, अधिकाऱ्यांनी हॉटेलच्या खोलीतून अनेक औषधे जप्त केली आहेत. तिवारीचा मृत्यू औषधांच्या अतिसेवनामुळे झाला असावा असा प्राथमिक संशय आहे. मात्र, पोलिसांना वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहे. प्राथमिक माहितीनुसार, तिवारी हा अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाशी परिचित होता. 2 नोव्हेंबर रोजी दुपारी 3:15 च्या सुमारास तो मुलीला प्रेक्षणीय स्थळे पाहण्याच्या बहाण्याने तो पीडितेला मुंबईला घेऊन आला. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिवारीने हॉटेलची खोली सुरक्षित करण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केला आणि संशय टाळण्यासाठी अल्पवयीन मुलीला आपली मुलगी म्हणून सादर केले.