Supriya Sule-Ajit Pawar Bhaubeej 2023: राजकीय मतभेद दूर सारत सुप्रिया सुळेंनी जपला नात्याचा मान; अजित पवारांचे भाऊबीजेला औक्षण
अजित पवार यांच्या राजकीय वाटा शरद पवारांपासून वेगळ्या झाल्या असल्या तरीही दोघांकडूनही कौटुंबिक बांधिलकी जपली जात आहे.
एनसीपी मध्ये फूट पाडत अजित पवार शरद पवारांपासून दूर झाले. पण अजित पवारंनी हा राजकीय मतभेद कटाक्षाने कौटुंबिक प्रसंगी मात्र दूर ठेवला. काही दिवसांपूर्वीच पुण्यात पवार कुटुंब प्रताप पवारांकडे एकत्र आले होते त्यानंतर दरवर्षी प्रमाणे बारामती मध्येही पवार कुटुंबाने एकत्र दिवाळी साजरी केली. दरवर्षीप्रमाणे यंदाही सुप्रिया सुळेंनी अजित पवारांचे औक्षण केले त्यांचे पाया पडून आशिर्वाद घेतले. सुप्रिया सुळेंनी त्यांचे फोटोज इंस्टाग्राम वर शेअर देखील केले आहेत.
पहा सुप्रिया सुळेंची पोस्ट
#WATCH | NCP MP Supriya Sule celebrated Bhaubeej with Maharashtra Deputy CM and her cousin Ajit Pawar yesterday, 15th November.
(Video: Supriya Sule social media) pic.twitter.com/TwyEuXsEM6
— ANI (@ANI) November 16, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 16, 2023 11:04 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

