Pratap Sarnaik Protection From Arrest:अटक टळली, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलाताना देशावरील कृषी काद्याचे आणि सरनाईक कुटुंबीयांवरील इडीचे इडापीडा टळो असे गाऱ्हाणे आपण श्री सिद्धीविनायक चरणी घातल्याचे सांगितले. दरम्यान, न्यायालयाच्या रुपात सरनाईक यांना आज बाप्पाच पावला अशी चर्चा सुरु झाली आहे.

Pratap Sarnaik | (Photo Credits-Facebook)

अन्वय नईक आत्महत्या प्रकरण, कंगना रनौत आणि अर्णब गोस्वामी प्रकरणांमध्ये आवाज उठवणाऱ्या शिवसेना (Shiv Sena) आमदार प्रताप सरनाईक (Pratap Saranaik ) यांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या दिलाशामुळे प्रताप सरनाईक यांची अटक टळली आहे. टॉप सिक्योरिटी (Top Security Agency) एमएमआरडीए आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) पथकाने प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा विहंग सरनाईक याच्या घरावर चौकशीसाठी छापा टाकला होता. ईडी (ED) ने ही कारावई 24 नोव्हेंबर 2020 या दिवशी केली होती.

विहंग सरनाईक यांची ईडीने पाच तास चौकशी केली. त्यानंतर ईडीने प्रताप सरनाईक यांनाही नोटीस पाठवली आणि चौकशीसाठी बोलावणे धाडले. परंतू, प्रताप सरनाईक हे चौकशीसाठी गेले नाहीत. दरम्यान, सरनाईक यांनी ईडीच्या कारवाईला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयाने सरनाईक यांना दिलासा देत प्रताप सरनाईक कुटुंबीयांवर कोणताही कारवाई करु नये असे आदेश दिले आहेत. न्यायालयाने याच आदेशात सरनाईक यांना चौकशीसाठी मात्र बोलवता येऊ शकते मात्र त्यांना अटक करता येणार नसल्याचे म्हटले आहे. (हेही वाचा, Amit Chandole Sends to ED Custody: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अमित चांदोळे यांना 9 डिसेंबर पर्यंत ED कोठडी, स्पेशल PMLA कोर्टाचा निर्णय)

प्रताप सरनाईक यांनी मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धीविनायक मंदिरात सहकुटुंब जाऊन दर्शन घेतले होते. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलाताना देशावरील कृषी काद्याचे आणि सरनाईक कुटुंबीयांवरील इडीचे इडापीडा टळो असे गाऱ्हाणे आपण श्री सिद्धीविनायक चरणी घातल्याचे सांगितले. दरम्यान, न्यायालयाच्या रुपात सरनाईक यांना आज बाप्पाच पावला अशी चर्चा सुरु झाली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif