Nagpur Suicide: अवैद्य सावकाराच्या जाचाला वैतागून एका कर्जदाराची गळफास लावून आत्महत्या; नागपूर येथील घटना

ही घटना नागपूर (Nagpur) जिल्ह्यात घडली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी सावकाराच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Death (Image used for representational, purpose only) (Photo Credits: PTI)

अवैद्य सावकाराच्या जाचाला वैतागून एका 50 वर्षीय कर्जदाराने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना नागपूर (Nagpur) जिल्ह्यात घडली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी सावकाराच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मृत कर्जदाराने गेल्या काही दिवसांपूर्वी एका अवैद्य सावकाराकडून व्याजाने काही रक्कम घेतली होती. लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणींमुळे कर्जदार या सावकाराचे पैसे परत करण्यास असमर्थ ठरला. ज्यामुळे सावकार येता-जाता कर्जदाराला मानसिक त्रास द्यायचा. या त्रासाला वैतागून कर्जदाराने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.

हेमंत विजयराव खराबे असे आत्महत्या केलेल्या कर्जदाराचे नाव असून ते प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्नेहनगरात राहत होते. हेमंत यांनी लॉकडाऊन पूर्वी म्हाडा कॉलनी निवासी गुलाब यज्ञनारायण दुबे यांच्याकडून व्याजाने काही रक्कम घेतली होती. परंतु, लॉकडाऊन दरम्यान आर्थिक अडचणींना सामोरे जाव लागत असल्यामुळे हेमंत हे गुलाब यांना पैसे परत करण्यास असमर्थ ठरले. दरम्यान, गुलाब हा वारंवार हेमंत यांना फोन करून मानसिक त्रास देत असे. त्याच्या या त्रालासा वैतागून हेमंत यांनी 28 सप्टेंबर रोजी गळफास लावून आत्महत्या केली. हे देखील वाचा- Jalgaon Massacre Case: जळगाव हत्याकांड प्रकरणातील पीडित कुटुंबीयांची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली भेट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंत यांच्या आत्महत्यानंतर अकस्मात मृत्यूंची नोंद करण्यात आली होती. मात्र, याप्रकरणी पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर सावकारच्या त्रासाला वैतागून हेमंत यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुलाब दुबे विरोधात गुन्हा दाखल केला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif