Byculla Station वर बॉयफ्रेंड लग्नाला तयार नसल्याच्या रागातून 22 वर्षीय तरूणीचा आत्महत्येचा प्रयत्न; मोटारमॅनच्या सतर्कतेने वाचले प्राण

आत्महत्या प्रयत्न । PC: Twitter

मुंबई मध्ये शनिवारी संध्याकाळी 22 वर्षीय तरूणीचा आत्महत्येचा प्रयत्न मध्य रेल्वेच्या मोटारमॅन आणि आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे टळला आहे. भायखळा स्टेशन (Byculla station) मध्ये ही घटना घडली आहे. या तरूणीने आत्महत्येचे दोनदा प्रयत्न झाल्याचं सांगितलं आहे.

पहिल्यांदा 5.55 वाजता धीम्या मार्गावरील कुर्ला कडे जाणार्‍या ट्रेन समोर ती उभी राहिली. प्लॅटफॉर्मवर असलेल्या प्रवाशांनी तिला दूर जाण्यास सांगितलं. मोटारमॅन देखील जोर जोरात हॉर्न वाजवत असल्याचं पाहून लोकांनि तिला दूर केलं. पण ही मुलगी नंतर सीएसएमटी कडे जाणार्‍या मार्गिकेवर गेली. धावत ती समोरून येणार्‍या ट्रेनकडे गेली. तेथेही मोटारमॅन ने जोरात हॉर्न वाजवण्यास आणि इमरजन्सी ब्रेक दाबण्यास सुरूवात केली.

मुलगी ट्रॅकवरून दूर जात नाही हे पाहून असिसटंट सब इन्सपेक्टर रविंद्र सानप धावत आले आणि मोटारमॅनला अलर्ट केले. सुदैवाने तिच्या समोर काही इंच ट्रेन थांबली.  नक्की वाचा:  Suicide: शिकवणीतून घरी येण्यास वडिलांनी दिला नकार, संतप्त मुलाने 9 मजली इमारतीवरून मारली उडी .

आत्महत्येचा प्रयत्न करणारी तरूणी दादरची आहे. बॉयफ्रेंड सोबत लग्न करण्याच्या घाई वरून त्या दोघांमध्ये वाद झाले आहेत. तो बॉयफ्रेंडदेखील स्टेशन वर उभा होता. त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये तो लग्नाला तयार आहे पण लगेच लग्न करू शकत नसल्याचं सांगितले. पोलिसांनी समजूत घालून दोघांनाही घरी पाठवलं आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif