IPL Auction 2025 Live

US Parishad 2021: राजू शेट्टी यांचा प्लॅन काय? महाविकासआघाडीची साथ सोडणार? ऊस परिषदेत मोठं विधान, शरद पवार आणि भाजपवरही टीकास्त्र

शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm Uddhav Thackeray) आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांना लिहिलेल्या पत्राचीही खिल्ली उडवली.

Raju Shetti | (Photo Credits: Facebook)

स्वाभीमानी शेतकरी संघटनेची ( Swabhimani Shetkari Saghtana) ऊस परीषद (Sugarcane Council 2021) आज (19 ऑक्टोबर) कोल्हापूर (Kolhapur) येथे पार पडली. या परिषदेत स्वाभीमानीचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी संघटनेची भूमिका मांडलीच. परंतू, त्यासोबतच 'महाविकास आघाडीसोबत (Maha Vikas Aghadi) गेल्याचा पश्चाताप होतो' असं म्हणत मोठं विधान करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि भारतीय जनात पक्ष यांच्यावरही जोरदार टीकास्त्र सोडले. शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm Uddhav Thackeray) आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांना लिहिलेल्या पत्राचीही खिल्ली उडवली. त्यामुळे महाविकासआघाडीबाबत केलेले विधान आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह भाजपवरही (BJP) केलेली टीका पाहता राजू शेट्टी यांचा नेमका प्लॅन काय? याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, Raju Shetti: एफआरपी थकवला तर, साखर कारखाने बंद पाडणार; स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा इशारा)

ऊस परीषदेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला इशारा देत म्हणत, ऊस उत्पादक शेतकरीच दूर गेले तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काय होईल याचा त्या पक्ष नेतृत्वाने विचार करावा. महाविकासाघाडी सरकारने राज्यात सर्वांना फसवले आहे. मग ते वीज ग्राहक असो, पूरग्रस्त असोत किंवा ऊस उत्पादक शेतकरी असो. त्यामुळे सरकारमध्ये राहायचे किंवा नाही याचा विचार करण्याची आता वेळ आली आहे. आता कोणाला भेटायला जायचे नाही. महाविकास आघाडीसोबत गेल्याचा पश्चाताप होतो, असेही राजू शेट्टी या वेळी म्हणाले.

US Parishad Kolhapur | (Photo Credits: Facebook)

भाजपचे किरीट सोमय्या आता जे आरोप करत आहेत त्याबाबत मी सहा वर्षांपू्वीच ईडीकडे तक्रार केली आहे. मात्र, त्या वेळी ईडी झोपली होती. आता सोमय्या यांच्या आरोपामुले शहाणी झाली असल्याची टीका शेट्टी यांनी केली. ईडीकडून सुरु असलेल्या कारवाईचे आम्ही स्वागतच करु. पण त्या आधी हे सर्व कारखाने पुन्हा शेतकऱ्यांच्या ताब्यात जातील हे जाहीर करा, असे आव्हानच शेट्टी यांनी ऊस परिषदेच्या माध्यमातून दिले. शिवाय जे कारखाणे पाठिमागच्या हंगामाची एफआरपी देत नाही त्यांना गाळप परवाना देऊच नका, अशी भूमिकाही राजू शेट्टी यांनी व्यक्त केली.

व्हिडिओ

राज्यात सत्तेत असलेले महाविकासआघाडी सरकार हे पावसात भीजत भीजत आले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दु:खाची जाण या सरकारला असेल असे वाटले होते. मुख्यमंत्र्यांनीही माझ्यावर विश्वास ठेवा असे सांगितले. पण तसे घडले नाही. शेतकऱ्यांना काही द्यायचं म्हटलं की पैसे नाही म्हणणारे सरकार 11% महागाई भत्ता जाहीर करते. तेव्हा पैसा कुठून येतो असा सवालही शेट्टी यांनी उपस्थित केला. गेली 19 वर्षे आपण याच मैदानात ऊस परिषद घेऊन दर वाढवून घेताल. पहिली ऊस परिषद घेतली तेव्हा माझी दाढी काळी होती आणि डोक्याला बँडेच होते. आता दाढी पांढरी झाली आहे. आजही ऊस परिषद घ्यावी लागते आहे. म्हणजे आजूनही प्रश्न कायम आहेत, असेही राजू शेट्टी म्हणाले.

दरम्यान, जर शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार नसेल तर मंत्र्यांचीही दिवाळी गोड होऊ देऊ नका. दिवाळीला आपापल्या गावी येणाऱ्या मंत्र्यांना काळे झेंडे दाखवा, असे अवाहनही राजू शेट्यी यांनी शेतकऱ्यांना केले.