Ajay Chaudhari vs Sudhir Salvi: शिवडी मधून ठाकरे गटाने अजय चौधरी यांना तिकीट जाहीर करताच सुधीर साळवी समर्थकांची संतापून घोषणाबाजी; सुधीर साळवींच्या भूमिकेकडे सार्यांच लक्ष
यंदा हे शिवडीमधून ठाकरे गटाकडून निवडणूक लढण्यास इच्छूक आहेत.
शिवडी विधानसभा मतदारसंघामध्ये अजय चौधरी आणि सुधीर साळवी (Sudhir Salvi) यांच्यामधून उद्धव ठाकरेंनी काल अजय चौधरींना तिकीट जाहीर केले आहे. यंदा विधानसभेसाठी सुधीर साळवींनी देखील सुरूवातीपासून फिल्डिंग केले होते पण ठाकरेंनी संकटकाळात सर्वजण सोडून जात असताना अजय चौधरी सोबत राहिल्याने त्यांना संधी देत असल्याच म्हणत तिकीट जाहीर केले आहे. पण या निर्णयामुळे ठाकरे गटात दुफळी माजली आहे. मोठ्या संख्येने काल रात्री सुधीर साळवी लालबाग मधील शिवसेनेच्या शाखेबाहेर त्यांचे समर्थक जमले होते. यावेळी अनेकांनी राजीनामा देणार असल्याचं सांगत संतापून घोषणाबाजी केल्याचं चित्र दिसलं आहे.
दरम्यान आज सुधीर साळवी संध्याकाळी कार्यकर्त्यांशी बोलणार आहेत. यावेळी ते काय भुमिका घेणार? याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे. आज संध्याकाळी 7.30 वाजता सुधीर साळवी लालाबाग मार्केट मध्ये समर्थकांना संबोधित करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता ते काय मोठा निर्णय घेणार? याची उत्सुकता वाढली आहे. त्यांच्या समर्थकांकडून ठाकरे गट तिकीट देत नसल्यास महायुती कडून निवडणूक लढण्याचा विचार करावा असेही सूचवत आहेत. Lalbaugcha Raja 2024: 'लालबागच्या राजा' च्या चरणी मंडळाचे मानद सचिव 'सुधीर साळवी आमदार होऊ दे' ची चिठ्ठी.
सुधीर साळवींच्या घराबाहेर समर्थकांची गर्दी
कोण आहेत सुधीर साळवी?
सुधीर साळवी हे शिवसैनिक आहेत. त्यांच्यावर उद्धव ठाकरेंनी शिवडी विधानसभा संघटक, दक्षिण मुंबई लोकसभा समन्वयक म्हणून जबाबदारी दिली आहे. सोबतच लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे ते मानद सचिव आहेत. यंदा हे शिवडीमधून ठाकरे गटाकडून निवडणूक लढण्यास इच्छूक आहेत.
शिवडीच्या जागेसाठी मनसे कडून बाळा नांदगावकर यांना तिकीट जाहीर करण्यात आले आहे. त्यांच्यासमोर मविआ कडून अजय चौधरींचे आव्हान आहे. तर महायुतीने अद्याप या जागेवर उमेदवार जाहीर केलेला नाही.