Sudhir Mungantiwar on Thackeray Government: फडणवीसांचे सरकार गेले फसवणाऱ्यांचे सरकार आले, सुधीर मुनगंटीवारांचा हल्लाबोल

Sudhir Mungantiwar | Photo Credits: Twitter/ ANI

Sudhir Mungantiwar on Thackeray Government: राज्यातील ठाकरे सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. पण विरोधकांनी याच ठाकरे सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभुमीवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारवर टीका करत असे म्हटले आहे की, देवेंद्र फडवणीस यांचे सरकार गेले आणि आता फसवणाऱ्यांचे सरकार आले आहे. तसेच ठाकरे सरकराने नागरिकांच्या अपेक्षा भंग केला असून या सरकारचा खरा चेहरा आम्ही समोर दाखवू पाहत आहोत.(मुख्यमंत्र्यांनी सामना ला दिलेल्या मुलाखतीत केवळ धमक्या दिसल्या वर्षपूर्तीचा आढावा नाही- देवेंद्र फडणवीस)

सुधीर मुनगंटीवार यांनी नागपूरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ठाकरे सरकारवर टीकास्र सोडल्याचे दिसून आले. मुनगंटीवार यांनी पुढे असे ही म्हटले की, देवेंद्र फडवणीस यांचे सरकार गेल्याच वर्षी पडले. मात्र त्यानंतर आलेल्या ठाकरे सरकारकडून लोकांना न्याय मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु त्याची सुद्धा अपेक्षाभंग झाली आहे. ऐवढेच नाही तर ठाकरे सरकारमुळे वर्षभरात जगंलराज ही निर्माण झाल्याचा हल्लाबोल मुनगंटीवार यांनी केला आहे.(Kirit Somaiya on Thackeray Government: 'ठाकरे सरकार उत्तर द्या' म्हणत वर्षपूर्ती निमित्त किरीट सोमय्या यांनी विचारले 10 प्रश्न)

राज्य सरकारचे कार्य पाहिले असता ते शून्य आहे असे ही मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. त्याचसोबत प्रत्येक मंत्री आपले अपयश लपवण्यासाठी केंद्र सरकारकडून जीएसटी रक्कम देत नसल्याचे ओरडून सांगत आहे. ऐवढेच नव्हे तर वीज बिल माफीसाठी केंद्रानेच पैसे द्यावेत अशी ही मागणी ठाकरे सरकारकडून केली जात आहे.