Polytechnic Courses Admission: पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांच्या ऑनलाईन नोंदणी प्रवेशासाठी शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही; राज्य तंत्र शिक्षण संचालनालयाचा मोठा निर्णय

कोविड-19 च्या संकटामुळे विद्यार्थ्यांना कागदपत्र मिळण्यास अडचणी येण्याची शक्यता असल्याने डीटीईने हा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. यासंदर्भात डीटीईच्या अधिकाऱ्याने माहिती दिली आहे.

Representational Image (Photo Credits: PTI)

पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश (Polytechnic Courses Admission) घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी (Online Registration) प्रक्रियेदरम्यान शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र (School Leaving Certificate) सादर करावे लागणार नाही, असे राज्य तंत्र शिक्षण संचालनालयाने (State Directorate of Technical Education) (DTE) म्हटले आहे. कोविड-19 च्या संकटामुळे विद्यार्थ्यांना कागदपत्र मिळण्यास अडचणी येण्याची शक्यता असल्याने डीटीईने हा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. यासंदर्भात डीटीईच्या अधिकाऱ्याने माहिती दिली आहे.

इतर महत्त्वाच्या बदलांमध्ये महाराष्ट्राच्या बाहेरून इयत्ता आठवी व नववीचे शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थीदेखील पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात. डीटीईने पॉलिटेक्निकसाठी अधिवासांचे निकष अंशतः शिथिल केले आहेत. यासंदर्भात टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वेबसाईटने वृत्त प्रकाशित केलं आहे. (हेही वाचा - University Final Year Exams: विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या युवासेना सह अन्य विद्यार्थ्यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी)

दहावीनंतर 3 वर्षाच्या अभियांत्रिकी पदविका तसेच, बारावी विज्ञान नंतरच्या औषधनिर्माण पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सोमवारपासून सुरुवात होणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना 25 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे.

दरम्यान, औरंगाबाद येथील शासकीय पॉलिटेक्निकशी संबंधित ज्येष्ठ प्राध्यापक एस. पी. शिराळकर म्हणाले की, विद्यार्थ्यांना प्रवेशप्रक्रियेसाठी शाळा सोडल्याचा दाखला अनिवार्य न केल्यास प्रवेश प्रक्रियेला गती मिळेल. पदविका अभियांत्रिकी प्रवेशासाठी राज्यात 341 तर, औरंगाबाद विभागात 52 सुविधा केंद्रे आहेत. तसेच औषधनिर्माण अभ्यासक्रमासाठी राज्यात 248 तर, औरंगाबाद विभागात 53 सुविधा केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्यातून आठवी नववी व दहावी उत्तीर्ण असण्याची पात्रता आता बदलण्यात आली असून यावर्षी महाराष्ट्रातून केवळ दहावी उत्तीर्ण विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरणार आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif