Maharashtra COVID-19 Guidelines: राज्यात उद्या मध्यरात्रीपासून कडक निर्बंध लागू, जाणुन घ्या नियम

यावेळी, एकाच वेळी पाचपेक्षा जास्त लोक बाहेर पडू शकणार नाहीत.

Night Curfew (Photo Credits: ANI/Twitter)

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने (Maharashtra Govt) नवीन नियमावली जाहीर केली आहे. रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लागू केला आहे. हा नाईट कर्फ्यू 10 जानेवारीपासून लागू होईल. या काळात 5 पेक्षा जास्त लोक बाहेर पडू शकणार नाहीत. रात्री कर्फ्यू दरम्यान, पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र बाहेर पडण्यास बंदी असेल. महाराष्ट्र सरकारच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, स्विमिंग पूल, जिम, स्पा, ब्युटी सलून, प्राणीसंग्रहालय, संग्रहालये आणि मनोरंजन पार्क बंद राहणार आहेत. त्याच वेळी, हेअर कटिंग सलून आणि मॉल्स 50 टक्के क्षमतेने चालवण्यास सक्षम असतील. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सरकारने हे पाऊल उचलले आहे.

Tweet

उद्यापासुन रात्रीचा कर्फ्यू लागू होणार 

महाराष्ट्रात कोरोनाचे प्रमाण वाढत आहे. एका दिवसात हजारोंच्या संख्येने संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळेच सरकारने रात्रीचा कर्फ्यू जाहीर केला आहे. राज्यात 10 जानेवारीपासून रात्रीचे निर्बंध कायम राहणार आहेत. यावेळी, एकाच वेळी पाचपेक्षा जास्त लोक बाहेर पडू शकणार नाहीत. (हे ही वाचा Corona Virus Update: गेल्या 24 तासांत मुंबईत आढळले 20 हजार 318 कोरोना रुग्ण, 5 बाधितांचा मृत्यू)

सरकारची नवीन कोरोना मार्गदर्शक सूचना

वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने नवीन कोरोना गाइडलाइन जारी केले आहे. त्यानुसार राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत. त्याचबरोबर रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यात आता दिवसा जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दिवसा पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. चित्रपटगृहे आणि खाजगी कार्यालये फक्त 50 टक्के क्षमतेनेच सुरू करता येतील. लग्न समारंभासाठी 50 जणांना परवानगी असेल. शॉपिंग मॉल आणि बाजार कॉम्पलेक्स 50 टक्के क्षमतेने सुरू असणार. रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार. रात्री 10 ते सकाळी 5 हॉटेल  बंद राहणार आहे. होम डिलिव्हरी सुरु राहणार आहे. तर स्विमिंग पूल, पर्यटन स्थळे आणि जिम पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. मात्र, सध्या तरी सरकारने मुंबई लोकल ट्रेनच्या प्रवासावर कोणतेही निर्बंध घातलेले नाहीत.

आज महाराष्ट्रात 40 हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर शनिवारी मुंबईत 20 हजार 318 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशाप्रकारे मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी वीस हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.