Sujay Vikhe Patil: Remdesivir खेरेदी प्रकरणी भाजप खासदार सुजय विखे पाटील यांना कोर्टाने झापलं, 'अशा वेळी हेतू कधीही शुद्ध नसतो' असे म्हणत सुनावले
तेव्हा त्या कृतीमागे असलेला कोणताही हेतू शुद्ध राहात नसतो, असे न्यायालयाने म्हटले.
रेमडेसिविर (Remdesivir) इंजेक्शन्सचा साठा खरेदी प्रकरणात भाजप (BJP) खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांना न्यायालयाने चांगलेच झापले आहे. रेमडेसिविर इंजेक्शन्सचा (Remdesivir injection) साठा खरेदी केल्याप्रकरणी डॉ. सुजय विखे पाटील (Dr. Sujay Vikhe Patil) यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठासमोर ( Bombay High Court) सोमवारी (3 मे) सुनावणी झाली. या वेळी न्यायालयाने सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांच्यावर ताशेरे ओढत म्हटले की, कोणतीही एखादी चांगली गोष्ट करण्यसाठी जेव्हा गैरमार्गाचा वापर केला जातो. तेव्हा त्या कृतीमागे असलेला कोणताही हेतू शुद्ध राहात नसतो, असे न्यायालयाने म्हटले.
मुंबई उच्च न्यायालयात युक्तीवाद करताना सुजय विखे पाटील यांच्या वकीलांनी मुद्दा मांडला की, आमचे आशी कोणत्याही प्रकारे गुन्हेगार या प्रकारात मोडत नाहीत. त्यांनी केवळ मानवता आणि लोकांना मदत या भावनेतूनच रेमडेसिविर (Remdesivir) इंजेक्शन्स खरेदी केली. हे अतिधाडसाचे होते हे आम्हाला माहिती आहे. परंतू, याला गुन्हा म्हणता येणार नाही, असा बचाव विखे पाटील यांच्या वकिलांनी केला. तसेच, सुजय विखे पाटील हे एक डॉक्टर आणि प्रतिष्ठीत व्यक्ती आहेत. ते न्यूरोसर्जन आहेत. तरीही त्यांची स्मृती रुग्णालय ही संस्था एका रात्रीत मोठी झाल्याचे चित्र दाखवले जात आहे.
दरम्यान, विखे पाटील यांच्या वकिलाच्या युक्तीवादावर न्यायमूर्ती भडकले. न्यायमूर्ती म्हणाले, तुमच्या आशिलांनी आत्मपरीक्षण करायला हवे. जर त्यांनी जनहीतासाठी आणि लोकांच्या काळजीपोटी रेमडेसिविर इंजेक्शन्स विमानातून आणली असतील तर त्यांनी त्याचे व्हिडिओ चित्रिकरण करण्याचा नाटकीपणा करण्याची काहीच आवश्यकता नव्हती. मतदारसंघातील लोकांच्या हितासाठी आपण दिल्लीहून आपले वजन वापरुन रेमडेसिवीर आणली हे दाखवण्याचा दिखावूपणा करणए त्यांनी टाळायला हवे होते, असेही न्यायालयाने म्हटले.
काय आहे प्रकरण?
खासदार सुजय विखे पाटील यांनी मतदारसंघातील कोविड रुग्णांसाठी दिल्लीहून 10 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्स आणल्याचा एक व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला होता. यावरुन मोठे वादळ निर्माण झाले. हे प्रकरण कोर्टात पोहोचले. दरम्यान, या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सुज विखे यांनी दिल्लीहून 10 हजार नव्हे तर केवळ 1200 इंजेक्शन्स आणल्याचे विखे यांच्या वकिलांनी सांगितले. चार्टर्ड विमानातून आणलेल्या 15 बॉक्समध्ये 1200 इंजेक्शन्स होती, असे विखे पाटील यांचे वकील म्हणाले.