Bombay HC Cancels Rape Case: 'संबंध सहमती'चे असल्याचे नमूद करत मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला 73 वर्षांच्या वृद्धावरील बलात्काराचा खटला

Law gavel lights प्रतिकात्मक प्रतिमा (PC - Pixabay)

Bombay HC Cancels Rape Case: 1987 पासून एका महिलेचे लैंगिक शोषण (Sexual Exploitation) केल्याप्रकरणी एका 73 वर्षीय पुरुषाविरुद्ध दाखल करण्यात आलेला खटला मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) रद्दबातल ठरवत हे संबंध सहमतीचे असल्याचे नमूद केले आहे. न्यायमूर्ती ए एस गडकरी आणि नीला गोखले यांच्या खंडपीठाने बुधवारी या खटल्याची सुनावणी करताना एफआयआरमधील मजकूर 'स्पष्टपणे सहमतीचे नाते दर्शवते', असं निरीक्षण नोंदवलं. यावेळी खंडपीठाने नमूद केले की, एफआयआर 2018 मध्ये दाखल करण्यात आला होता आणि विलंबासाठी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. पक्षकार तब्बल 31 वर्षांपासून लैंगिक संबंधात होते. पक्षकारांमधील संबंध बिघडले आणि त्यानंतर तक्रारदाराने पोलिसात तक्रार नोंदवली. प्राप्त माहितीनुसार, महिला 1987 मध्ये पुरुषाच्या कंपनीत रुजू झाली होती. त्यावेळी आरोपीने तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप महिलेने केला आहे.

त्यानंतर, जुलै 1987 ते 2017 या कालावधीत तब्बल 30 वर्षे आरोपींनी तिच्यावर कल्याण, भिवंडीसह विविध हॉटेल्समध्ये बलात्कार केला. पुरुषाने तिच्याशी लग्न करण्याचे वचन दिले. 1993 मध्ये तिच्या गळ्यात 'मंगळसूत्र' घातले आणि ती त्याची दुसरी पत्नी असल्याचे जाहीर केले. त्याने तिला इतर कोणाशीही लग्न करण्याची परवानगी दिली नाही. (हेही वाचा - Jalgaon Rape Case: सहा वर्षीय मुलीची बलात्कारानंतर हत्या; संतप्त जमावाचा पोलिसांवर हल्ला; जळगाव जिल्ह्यातील घटना)

महिलेने दावा केला की, 1996 मध्ये आरोपीला हृदयविकाराचा झटका आला म्हणून तिने कंपनीची देखभाल केली. मात्र, सप्टेंबर 2017 मध्ये तिच्या आईला कॅन्सर झाला आणि तिला नोकरीवरून सुट्टी घ्यावी लागली. जेव्हा ती पुन्हा कंपनीत जाण्यासाठी निघाली तेव्हा तिला ऑफिस बंद आणि कंपनीचे गेट कुलूपबंद दिसले. महिलेने पुरुषाशी संपर्क केला असता त्याने तिला भेटण्यासही नकार दिला. (हेही वाचा -Mira Road Rape case: 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, आरोपीवर गुन्हा दाखल; संतप्त जमावाने फोडला चिकन शॉप)

खंडपीठाने निरीक्षण केले की, एफआयआर स्वतः सूचित करते की, महिलेला आरोपी विवाहित असल्याची माहिती होती. हे माहित असूनही तिने लग्नाबाबतच्या त्याच्या आश्वासनावर विश्वास ठेवला. कायद्याने दुस-या लग्नाला मनाई केली आहे हे जाणून घेण्यासाठी ती पुरेशी प्रौढ आहे आणि आरोपीने आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन नंतर तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिल्याचा तक्रारीत कोणताही आरोप नाही.  (हेही वाचा, Hyderabad Horror: पॉर्न व्हिडिओ पाहण्याचे व्यसन असलेल्या बापाची पोटच्या मुलीवर सेक्सची जबरदस्ती; नकार दिल्याने केली हत्या)

दरम्यान, ही पूर्णपणे स्त्रीच्या इच्छापूर्तीची विचारसरणी असेल. गेल्या 31 वर्षांत महिलेला तेथून पळून जाण्याच्या आणि आरोपींविरुद्ध तक्रार नोंदवण्याच्या अनेक संधी होत्या. परंतु, तिने तसे केले नाही, असे निरीक्षणही खंडपीठाने यावेळी नोंदवले.