राज्य मंत्रिमडळ बैठकीमध्ये आज शाळा-कॉलेज चे ऑफलाईन वर्ग पुन्हा उघडण्यावर निर्णयाची शक्यता

सध्याची परिस्थिती पाहता हा निर्णय खबरदारीच्या दृष्टीने घेण्यात आल्याने आता कोरोना स्थिती आटोक्यात येत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील ऑफलाईन वर्ग सुरू करण्याला परवानगी देऊ शकतात.

CM Uddhav Thackeray | Photo Credits: twitter)

डिसेंबर महिन्यात तब्बल दीड-दोन वर्षांनी विद्यार्थ्यांसाठी शाळांचे दरवाजे उघडले होते पण ओमिक्रॉनची दहशत आणि वाढती कोरोना रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शाळा- कॉलेज पुन्हा बंद झाले आहेत. मात्र आता पुन्हा राज्यात कोरोना स्थिती आटोक्यात येण्यास सुरूवात झाल्याने पालकांकडून मुलांसाठी शाळांचे ऑफलाईन वर्ग सुरू करण्याची मागणी होत आहे. या बाबत शालेय विभागाकडून प्रस्ताव पाठवण्यात आला असून आज होणार्‍या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर चर्चा होऊ शकते असा अंदाज आहे. हे देखील नक्की वाचा: Maharashtra School Reopening Update: सोमवारपासून राज्यात शाळा सुरू होण्याची शक्यता, शिक्षण विभागाचा मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव .

महाराष्ट्रात मागील 20 दिवसांपासून बालवाडी ते महाविद्यालयं ही सारीच ऑफलाईन बंद ठेवण्यात आली आहेत. सध्याची परिस्थिती पाहता हा निर्णय खबरदारीच्या दृष्टीने घेण्यात आल्याने आता कोरोना स्थिती आटोक्यात येत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील ऑफलाईन वर्ग सुरू करण्याला परवानगी देऊ शकतात.

सध्या 15 वर्षांवरील मुलांना कोरोनाची लस दिली जात आहे. त्यामुळे यंदा दहावी-बारावीच्या परीक्षा देखील ऑफलाईन घेण्याची शिक्षण मंडळाची तयारी आहे. फेब्रुवारी महिन्यापासून 12वीच्या परीक्षा सुरू होत आहेत. तर मार्च महिन्यात 10वीच्या परीक्षांना सुरूवात होणार आहे. सध्या शाळा-कॉलेज बंद ठेवली असली तरीही 10-12वीचे ऑफलाईन वर्ग सुरू आहेत.

महाराष्ट्रात काल 443,697 नवे कोरोना रूग्ण आढळले आहेत. मागील 24 तासांच्या तुलनेत नव्या रूग्णसंख्येत 10% वाढ नोंदवण्यात आली आहे. तर 214 नवे ओमिक्रॉन रूग्ण देखील समोर आले आहेत. दुर्दैवाने यामध्ये 49 जणांचा मृत्यू झाला असून 46,591 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.