ST Workers Strike: संपानंतर कामावर परतलेल्या कर्मचाऱ्यांकडून वचनपत्रावर स्वाक्षरा? वाचा नेमके काय आहे प्रकरण
याच दरम्यान 3 टक्के वेतानात वाढ करण्याचा अध्यादेश जाहीर करण्यात आला आहे. परंतु संपानंतर कामावर परतलेल्या कर्मचाऱ्यांकडून एका वचनपत्रावर स्वाक्षरा करुन घेतल्या जात आहेत.
ST Workers Strike: एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर अडूनच राहिले आहेत. याच दरम्यान 3 टक्के वेतानात वाढ करण्याचा अध्यादेश जाहीर करण्यात आला आहे. परंतु संपानंतर कामावर परतलेल्या कर्मचाऱ्यांकडून एका वचनपत्रावर स्वाक्षरा करुन घेतल्या जात आहेत. त्या संबंधित पत्र सुद्धा व्हायरल झाले आहे. त्यामध्ये भविष्यात संप करणार नाही असे लिहण्यात आले आहे.(दिव्यांग नोंदणी प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळवण्यासाठी महाराष्ट्रात 12 डिसेंबर ते 12 मार्च दरम्यान विशेष मोहिम - सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची घोषणा)
राज्यातील एसटी आगारातून वाहतूक सुरु झाली आहे. परंतु दुसऱ्या बाजूला अद्याप मोठ्या संख्येने एसटी कर्मचारी कामावर पुन्हा रुजू झालेले नाहीत. मात्र संपातून माघार घेणारे कर्मचारी कामावर परतले असून त्यांच्याकडून वचनपत्र भरुन घेतले जात आहेत. परंतु त्यांनी भरलेले वचनपत्र त्यांना अडचणीत आणू शकते अशी भीती त्यांना वाटत आहे.
दरम्यान, ठाणे विभागीय कार्यालयाच्या वचनपत्रात असे म्हटले आहे की, 8 नोव्हेंबर 2021 पासून सुरु झालेल्या बेकायदेशीर संप/आंदोलनात सहभागी झालो होते. आज दिनांकपासून कर्तव्यावर रुजू होत आहे. त्यामुळे यापुढे संपात सहभागी होणार नाही. तसेच आंदोलनात कालावीत रजेची मागणी करणार नाही असे ही त्यामध्ये म्हटले आहे. या व्यतिरिक्त भविष्यात संपात सहभागी झाल्यास प्रशासनाकडून करण्यात येणारी कारवाई मान्य असेल ही त्यात सांगण्यात आले आहे.(Maharashtra Covid-19 Relief Application: कोरोनाकाळातील मृतांच्या कुटुंबीयास 50,000 रुपयांचे अर्थसहाय्य, महाराष्ट्र सरकारचा निर्णय; कुठे कराल अर्ज?)
दरम्यान, नवी वेतन वाढ एसटी कर्मचाऱ्यांसाठी नोव्हेंबर महिन्यात लागू केली जाणार आहे. असा निर्णय एसटी कॉर्पोरेशनने घेतला आहे. नवनियुक्त कर्मचाऱ्यांना 10 वर्षाच्या कालावधीसाठी 5 हजार रुपयांनी वाढ केली जाणार आहे. कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेला वेतन दिले जात होते. परंतु नवी वेतन वाढ ही त्याच कर्मचाऱ्यांना दिली जाणार जे कामावर परतले आहेत. कामावर परतलेल्या कर्मचाऱ्यांचे निलंबन रद्द केले जामार आहे. परंतु अद्याप काही कर्मचारी संपावर आहेत.