ST Employees Strike: एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा आठवा दिवस, मंत्रालयासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

तर आंदोलनाचा आज आठवा दिवस आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या विचारपूर्वक मान्य केल्या आहेत.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

ST Employees Strike: राज्यभरातील विविध ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून एसटी बस कर्मचाऱ्यांकडून आंदोलने केली जात आहे. तर आंदोलनाचा आज आठवा दिवस आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या विचारपूर्वक मान्य केल्या आहेत. परंतु एसटी महामंडाळाचे राज्य सरकारमध्ये विलिकरण करण्यात येण्याच्या मागणीवर अद्याप तोडगा निघालेला नाही. यामुळेच कर्मचारी आपल्या आंदोलनावर कायम आहेत. कर्मचाऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या आंदोलनामुळे काही जणांचे निलंबन सुद्धा करण्यात आले आहे. तर काही ठिकाणी त्याला हिंसक वळण लागल्याचे दिसून आले आहे,

अशातच आता एसटी बसच्या तीन-चार महिला कर्मचाऱ्यांनी मंत्रालयासमोर आत्महदनाचा प्रयत्न केला. तर एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिकरण करण्याच्या मागणीवरुनच त्यांनी हे पाऊल उचलले. सध्या त्या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, अनिल परब यांनी हा संप मागे घेण्याचे आवाहन कर्मचाऱ्यांना केले होते. त्याचसोबत कामावर परतावे असे ही परब यांनी म्हटले होते.(ST Workers Strike : सह्याद्री अतिथीगृहावरील महत्त्वपूर्ण बैठक संपन्न, अनिल परब यांनी दिली 'ही' माहिती)

तर बारामतीत एसटी संपात सहभागी झालेल्या 13 कर्मचाऱ्यांचे शुक्रवारी निलंबन केले गेले. यामध्ये एसटी बारामती बस डेपो मधील 7 आणि एमआयडीसी डेपोच्या 6 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा हा संप आणखी किती दिवस चालणार याबद्दल काहीच तोडगा निघालेला नाही. त्याचसोबत खासगी वाहन सेवा सुरु असल्याने प्रवाशांकडून तिकिटाचे अतिरिक्त पैसे वसूल केले जात आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांनी निलंबन केले तरीही आम्ही आमची मागणी पूर्ण होत नाही तोवर आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचे म्हटले आहे, राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे. समितीला रिपोर्ट चार आठवड्यात कोर्टात सादर करायचा आहे. तो पर्यंत आम्ही आंदोलन करणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif