ST Employee Suicide: नांदेड मध्ये एसटी बस चालकाची आत्महत्या; जिल्ह्यातील तिसरा बळी

Suicide (pic credit: Wikimedia Commons)

मागील चार महिन्यांपासून सुरू असलेला एसटीचा संप (ST Employee Strike) अजूनही तोडगा न निघाल्याने कायम आहे. एसटीचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावं या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत. दरम्यान या संपामुळे पगार न झाल्याने अनेकांची आर्थिक तंगी होत आहेत. नांदेड मध्ये अशाच एका एसटी कर्मचार्‍याने आत्महत्या  (ST Employee Suicide)  करत आपलं आयुष्य संपवलं आहे.

मीडीया रिपोर्ट्सनुसार, गंगाधर येवतीकर यांनी नांदेडमध्ये आपलं जीवन संपवलं आहे. गंगाधर हे 48 वर्षीय होते. नांदेड जिल्ह्यामध्ये मुखेड एसटी डेपो मध्ये ते चालक म्हणून काम करत होते. आपल्या राहत्या घरी गंगाधर यांनी विष पिऊन जीवन संपवलं आहे. ते संपात सहभागी असल्याने पगार बंद झाला आणि आर्थिक स्थिती बिकट होत गेली. आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. विलनीकरणाच्या प्रश्नी एस टी संपामधील हा नांदेड जिल्ह्यातील तिसरा बळी आहे. हे देखील नक्की वाचा: ST Bus Driver Suicide: संगमनेर एसटी डेपोत बस मध्येच चालकाने गळफास घेत संपवलं आयुष्य .

मुंबई हायकोर्टाकडून स्थापन करण्यात आलेल्या समितीने एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करू शकत नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे राज्यसरकार कडूनही संपकरी कर्मचार्‍यांनी कामवर पुन्हा रूजू व्हावे असं आवाहन केले आहे.

गंगाधर येवतीकर यांच्यापूर्वी सिडको येथील एका चालकाने आत्महत्या केली होती. तर एका कर्मचाऱ्याचा मेंदूच्या रक्तस्त्रावामुळे मृत्यू झाला होता.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif