Ganeshotsav 2019: गणेश भक्तांना घेऊन कोकणात जाणारी एसटी जळून खाक; 57 जण थोडक्यात वाचले, मुंबई-गोवा महामार्गावरील घटना

परंतू, एसटी बसचा मात्र जागीच कोळसा झाला. ही बस जळून पूर्णपणे खाक झाली. बसमधील सर्वजण गणेशोत्सवासाठी आपल्या गावी म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे येथे निघाले होते. आगीमध्ये काही प्रवाशांचे सामानही जळून खाक झाल्याचे समजते.

Fire | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

Ganpati Festival 2019: गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गणेशभक्तांना घेऊन कोकणात जाणाऱ्या एसटी बसला भीषण आग (ST Bus Fire) लागली. या आगीत ही भस जागीच जळून खाक झाली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. गाडीतून प्रवास करत असलेल्या 57 गणेश भक्तांचे प्राण थोडक्यात वाचले. ही घटना मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway) माणगावजवळ वडपाले येथे रविवारी (1 सप्टेंबर 2019) सकाळी सात वाजनेच्या सुमारास घडली. मुंबई येथील परळ येथून हे सर्व गणेशभक्त रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील सावर्डे ( Ratnagiri Savarde) येथे निघाले होते.

दरम्यान, आगीचे कारण समजू शकले नाही. प्राप्त माहिती अशी की, 57 प्रवाशांना घेऊन ही बस मुंबईतील परळ येथून निघाली. ही बस मुंबई गोवा महामार्गावरुन मार्गक्रमण करत होती. माणगाव नजीक असलेल्या वडपाले येथपर्यंत या बसचा प्रवास सुखरुप झाला. मात्र, वडपाले गावाजवळ येताच बसने अचानक पेट घेतला. अचानक घडलेल्या या प्रकाराने प्रवासी गोंधळून आणि प्रचंड घाबरुन गेले. मात्र, अशा आणिबाणीच्या स्थितीतही प्रवाशांनी प्रसंगावधान राखत बसमधून बाहेर पडण्याचे धौर्य दाखवले. त्यामुळे संभाव्य धोका टळला. (हेही वाचा, Ganeshotsav 2019: अष्टविनायक गणपती मंदिर, वैशिष्ट्ये आणि स्थळ; घ्या जाणून)

प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले. परंतू, एसटी बसचा मात्र जागीच कोळसा झाला. ही बस जळून पूर्णपणे खाक झाली. बसमधील सर्वजण गणेशोत्सवासाठी आपल्या गावी म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे येथे निघाले होते. आगीमध्ये काही प्रवाशांचे सामानही जळून खाक झाल्याचे समजते.

गणपती विशेष व्हिडिओ

दरम्यान, या घटनेनंतर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ रोखण्यात आली होती. त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडीचे चित्र निर्माण झाले. मात्र, त्यानंतर वाहतूक सुरु करण्यात आली. सध्यस्थितीत वाहतूककोंडी फुटली असली तर, महामार्गावरील वाहतू संत गतीने सुरु असल्याचे समजते.