ST Bus Employee Strike: कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी महामंडाळाचे 605 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची अनिल परब यांची माहिती

परिवहन मंत्री अनिल परब यांनी सोमवारी विधान परिषदेत एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलेल्या संपामुळे 605 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती दिली आहे.

मंत्री अनिल परब | (File Photo)

ST Bus Employee Strike: परिवहन मंत्री अनिल परब यांनी सोमवारी विधान परिषदेत एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलेल्या संपामुळे 605 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती दिली आहे. भाजपचे रणजीत सिंह मोहिते पाटील यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन भत्ता आणि वैद्यकिय भत्त्यावरुन काही प्रश्न विचारले होते. चर्चेच्या दरम्यान, शशिकांत शिंदे, परिनय फुके, गोपीचंद पडळकर यांनी सुद्धा काही प्रश्न विचारले.(Maharashtra Winter Session 2021: 65 नागरिकांचा वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात, तर 23 वाघांचा विविध कारणांमुळे मृत्यू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधीमंडळात माहिती)

कर्मचाऱ्यांना कामावर परतण्यासाठी काही संधी सुद्धा दिल्या. पण पूर्णक्षमतेने एसटी सुरु करण्यावर तेव्हाच विचार केला जाऊ शकतो जेव्हा सर्व कर्मचारी कामावर परत येतील. एसटीच्या संपादरम्यान पाच कर्मचाऱ्यांचा मृत्यू सुद्धा झाला. मृतांच्या परिवारातील सदस्याला अनुकंपाच्या आधारावर नोकरी देण्याचे निर्देशन दिले आहेत. या संबंधित तपास केला जात आहे.

परिवहन मंत्री अनिल परब यांनी असे म्हटले की, उत्तराधिकाऱ्यांना आर्थिक मदत देण्याबद्दल कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना अन्य राज्यांच्या समान वेतन दिले जात आहे. परब यांनी पुढे असे म्हटले की, राज्य सरकारने हे सुद्धा सुनिश्चित केले प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत वेतन हे दिले जाईल. (ST च्या विलिनीकरणाच्या मागणीवर अभ्यास करण्यासाठी समिती गठित; बारा आठवड्यांनंतर होणार निर्णय)

राज्य सरकारच्या विलिकरणाबद्दल तीन सदस्यीन समितीचा कोणताही रिपोर्टला मंजूरी देईल. आतापर्यंत कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात पुरेशी वाढ केल्यानंतर ही काही कर्मचाऱ्यांकडून संप पुकारण्यात आला आहे. त्याचसोबत कार्यकर्त्यांना अफवांना बळी पडू नये असे ही आवाहन केले आहे.