मुंबई सेंट्रल स्थानकात ट्रेन येताच वृद्धाने फ्लॅटफॉर्मवरुन मारली उडी; जवानांच्या समयसूचकतेमुळे वाचले प्राण (Watch Video)
मात्र MSF स्टाफला त्यांचे प्राण वाचवण्यात यश आले. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. पहा व्हिडिओ...
पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल (Mumbai Central) रेल्वे स्थानकात एका वृद्ध व्यक्तीने रेल्वेखाली येत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र MSF स्टाफच्या समयसूचकतेमुळे या वृद्ध व्यक्तीचे प्राण वाचले. लोकलची वाट पाहत उभी असलेली एक वृद्ध व्यक्ती ट्रेन येताच अचानक फ्लॅटफॉर्मवरुन उतरुन ट्रॅकवर उतरते. फ्लॅटफॉर्मवर उभे असलेले लोक आरडाओरड करताच MSF स्टाफ मनोज आणि अशोक यांनी रूळावर उडी मारत आजोबांना बाजूला केलं. आजोबांना बाजूला करताच काही क्षणात ट्रेन निघून गेली. मात्र हा सर्व धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून याचा व्हिडिओ पश्चिम रेल्वेने ट्विटरवरुन शेअर केला आहे. मुंबई: आसनगाव येथे धावत्या एक्स्प्रेसखाली सापडूनही प्रवासी सुखरुप (Viral Video)
पश्चिम रेल्वे ट्विट:
या वृद्ध व्यक्तीचे प्राण वाचवण्यात आले असून त्यांना त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आलं आहे. कुटुंबीयांनी देखील MSF स्टाफ मनोज आणि अशोक यांचे मनापासून आभार मानले. मात्र या वृद्ध व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न का केला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.