Chandrapur: उच्च न्यायालयाच्या आदेशाची चंद्रपूरात होणार अंमलबजावणी, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या नागरिकांकडून आकारला जाणार 'इतका' दंड
यामुळे महाराष्ट्रासह (Maharashtra) विविध राज्यांनी कोरोनासंबंधित निर्बंध आणखी कठोर केले आहेत.
संपू्र्ण भारतात कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेने थैमान घातले असताना देशात तिसरी लाट येण्याची भिती व्यक्त केली जात आहे. यामुळे महाराष्ट्रासह (Maharashtra) विविध राज्यांनी कोरोनासंबंधित निर्बंध आणखी कठोर केले आहेत. दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता उच्च न्यायालयाने (Supreme Court) सार्वजनिक ठिकामी थुंकणाऱ्यांना लगाम लावण्यासाठी 200 ऐवजी 1200 रुपये दंड आकारण्याचे सूचित केले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे चंद्रपूर शहर महानगरपालिका (Chandrapur Municipal Corporation) अंबलबजावणी करणार आहे. तसेच कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
देशात वाढणारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाय केले जात आहेत. मात्र, तरीही काहीजण रस्त्यावर थुंकत आहेत. ज्यामुळे कोरोनाचे विषाणू हवेत पसरण्याची भिती व्यक्त केली जात आहे. याचपार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे सूचना दिल्या होत्या. या आदेशाचे चंद्रपूर शहर महापालिकेा अंबलबजावणी करणार आहे. यापुढे रस्त्यावर थुंकणाऱ्या नागरिकांकडून 200 ऐवजी 1200 रुपये दंड आकारला जाणार आहे. हे देखील वाचा- पालघर येथे 103 वर्षीय आजोबांची कोरोनावर मात, फुलांचा वर्षावर करत व्यक्त केला आनंद
महाराष्ट्रात वाढणारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठीच्या नियमावलीत सोशल डिन्स्टन्सिंग राखणे, हात साबणाने वारंवार धुणे आणि मास्कचा वापर याचा समावेश करण्यात आलेला आहे. राज्यात काल 48 हजार 401 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. आज नवीन 60 हजार 226 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात एकूण 44 लाख 07 हजार 818 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात सध्या एकूण 6 लाख 15 हजार 783 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 86.4% झाले आहे.