Special Trains On WR For Anant Chaturdashi: अनंत चतुर्दशी दिवशी पश्चिम रेल्वे चालवणार गणेशभक्तांसाठी मध्यरात्री विशेष लोकल्स

लालबागचा राजा, गणेशगल्लीतील गणपती, चिंचपोकळीचा चिंतामणी यासह मुंबईतील अनेक मोठे गणपती गिरगाव चौपाटीवर विसर्जित केले जातात.

Mumbai Local | (Photo Credit - Twitter)

मुंबई मध्ये घरगुती गणेशोत्सवासोबतच सार्वजनिक गणेशोत्सव देखील मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. दहा दिवसांच्या सेवेनंतर अनंत चतुर्दशीला बाप्पा आपल्या गावी जाण्यासाठी निघतात. गणेशभक्तांसाठी हा निरोपाचा क्षण भावूक करणारा असतो. मुंबई मध्ये संपूर्ण रात्र बाप्पाची मिरवणूक रंगते. त्यामुळे अनंत चतुर्दशीला रात्री घरी परतणार्‍या गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून पश्चिम रेल्वेने विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वे अनंत चतुर्दशीच्या रात्री 8 विशेष ट्रेन्स चालवणार आहे. गुरुवारी मध्यरात्री आणि शुक्रवारी पहाटे या दरम्यान चर्चगेट ते विरार आणि विरार ते चर्चगेट या मार्गावर धीम्या लोकल चालवल्या जाणार आहेत.

अनंत चतुर्दशी दिवशी पश्चिम रेल्वे मार्गावरील ट्रेन्स

चर्चगेट ते विरार : गुरुवारी मध्यरात्रीनंतर १.१५, १.५५, २.२५ आणि शुक्रवारी पहाटे ३.२०

विरार ते चर्चगेट : गुरुवारी मध्यरात्रीनंतर १२.१५, १२.४५, १.४० आणि शुक्रवारी पहाटे ३

28 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी साजरी केली जाणार आहे. लालबागचा राजा, गणेशगल्लीतील गणपती, चिंचपोकळीचा चिंतामणी यासह मुंबईतील अनेक मोठे गणपती गिरगाव चौपाटीवर विसर्जित केले जातात. त्यांना निरोप देण्यासाठी, त्यांची भव्य मिरवणूक पाहण्यासाठी अनेक गणेशभक्त हमखास रस्त्यांवर गर्दी करतात. Special Trains On CR For Anant Chaturdashi: मध्य आणि हार्बर रेल्वे वर अनंत चतुर्दशी दिवशी चालवणार मध्यरात्री 10 विशेष लोकल्स .

बाप्पाच्या विसर्जन मिरवणूकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत अनेक ठिकाणी रस्ते वाहतूक देखील काही ठिकाणी बंद केली जाते तर काही ठिकाणी ती वळवली जाते.