Amit Chandole Sends to ED Custody: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अमित चांदोळे यांना 9 डिसेंबर पर्यंत ED कोठडी, स्पेशल PMLA कोर्टाचा निर्णय
Amit Chandole Send to ED Custody: टॉप सिक्युरिटी (Tops Security) समूहाच्या विरोधातील आर्थिक गैरव्यवहार गुन्ह्याप्रकरणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sirnaik) यांच्या घरासह कार्यालयावर काही दिवसांपूर्वी ईडीकडून छापेमारी करण्यात आली. या प्रकरणी प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय अमित चांदोळे यांना अटक करण्यात आली होती. तर ताज्या अपडेट्सनुसार, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चांदोळे यांना येत्या 9 डिसेंबर पर्यंत ED कोठडी स्पेशल PMLA कोर्टाने सुनावली आहे.(ED Summons Pratap Sarnaik: ईडीने शिवसेना खासदार प्रताप सरनाईक यांना तिसऱ्यांदा धाडले समन्स)
अमित चांदोळे यांची तब्बल 12 तास चौकशी केल्यानंतर ईडीकडून त्यांना 26 नोव्हेंबरला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता कोर्टाने त्यांना 9 डिसेंबर पर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. (प्रताप सरनाईक यांचे मित्र अमित चांदोळे यांना ED कडून अटक; टॉप्स सिक्युरिटी समुहाच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी तब्बल 12 तासांच्या चौकशीनंतर कारवाई)
दरम्यान, प्रताप सरनाईक यांच्या घरासह कार्यालयावर ज्या वेळी ईडीने धाड टाकली त्यावेळेस ते परदेशात होते. मात्र ईडीने छापेमारी केल्याचे कळताच ते भारतात परतले. त्यानंतर त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट ही घेतली. या दोघांमध्ये जवळजवळ दीड तास चर्चा झाल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी आपल्याला याबद्दल काहीच माहिती नसल्याचे मीडियाला सांगितले. त्याचसोबत कोणत्या संदर्भात ईडीने ही कारवाई केली हे सुद्धा कळले नसल्याचे प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले होते.
या छापेमारीनंतर मात्र भाजपच्या नेत्यांनी शिवसेना आणि त्यांचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली. त्यांनी असे म्हटले की, कोणत्याही पुराव्याशिवाय ईडी धाड टाकत नाही. ईडीकडे काहीतरी महत्वाचे पुरावे असतील आणि त्याची माहिती त्यांना मिळाली असणार असे म्हटले होते. त्याचसोबत जर प्रताप सरनाईक यांनी कोणता घोटाळा केला असेल तर त्याचा तपास जरुर करण्यात आला पाहिजे.