Imprisonment For Bribery: लाचखोरी भोवली! विशेष CBI न्यायालयाने माजी रेल्वे अधिकाऱ्याला सुनावणी 3 वर्षांची शिक्षा
आरोपीने तक्रारदाराकडून त्याच्याकडून केलेल्या कामांची बिले मंजूर करण्यासाठी अवाजवी रक्कम मागितली होती.
Imprisonment For Bribery: लाचखोरी (Bribery) करणे एका भारतात गुन्हा आहे. तरीदेखील अनेकदा अधिकारी कामांसाठी लाच (Bribe) घेतात. मात्र, माजी रेल्वे अधिकाऱ्याला (Former Railway Officer) लाचखोरी चांगलीचं भोवली आहे. विशेष सीबीआय न्यायालयाने (CBI Court) माजी रेल्वे अधिकाऱ्याला लाचखोरीप्रकरणी 3 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सीबीआय न्यायालयाने तत्कालीन वरिष्ठ सहाय्यक आर्थिक सल्लागार (बांधकाम), उप उपायुक्त विद्या सागर आचार्य यांना तीन वर्षे सश्रम कारावास शिक्षा तसेच 75 हजार रुपये दंड ठोठावला आहे.
सीबीआयने 19 मार्च 2008 रोजी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. आरोपीने तक्रारदाराकडून त्याच्याकडून केलेल्या कामांची बिले मंजूर करण्यासाठी अवाजवी रक्कम मागितली होती. आरोपीला तक्रारदाराकडून 20 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. (हेही वाचा -Minister Arrested For Taking Bribe: लाचखोरी प्रकरणात मंत्र्यास अटक; वोलोडिमिर झेलेन्स्की यांची साफसफाई मोहीम)
दरम्यान, सीबीआयने आरोपींविरुद्ध 29 एप्रिल 2009 रोजी अवाजवी रक्कम मागणे आणि लाच स्विकारल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले होते. तथापी, न्यायालयाने खटल्यानंतर आरोपीला दोषी ठरवून त्यानुसार शिक्षा सुनावली आहे. (हेही वाचा - Madhya Pradesh Bribe Case: शाजापूरमध्ये सहकार उपायुक्तांना लाच घेताना रंगेहात पकडले, लोकायुक्त पोलिसांची कारावाई)
जून महिन्यात केंद्रीय अन्वेषण विभागाने मुंबईतील दोन पासपोर्ट सेवा केंद्रांवर (पीएसके) लाचखोरीच्या प्रकरणांसंदर्भात मुंबई आणि नाशिकमधील 33 ठिकाणी शोधमोहीम राबवल्या होत्या. झडतीनंतर सीबीआयला पासपोर्ट दस्तऐवजांशी संबंधित विविध दोषी कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे सापडले. त्यानंतर लोअर परळ आणि मालाडमधील पीएसकेमधील 14 अधिकाऱ्यांसह 32 जणांविरुद्ध आणि 18 पासपोर्ट सुविधा एजंटांविरुद्ध 12 गुन्हे दाखल करण्यात आले होते.